JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / नालासोपारा हादरलं, वाघोलीत केबलचालकाची कोयत्याने वार करून हत्या

नालासोपारा हादरलं, वाघोलीत केबलचालकाची कोयत्याने वार करून हत्या

सचिन नाईक हे शेतामध्ये गेले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नालासोपारा, 08 नोव्हेंबर : मुंबई (Mumbai) जवळील  नालासोपारा (Nalasopara) पश्चिमेकडील वाघोली गावात केबलचालकाची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची  घटना घडली आहे. या हत्येमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे सचिन नाईक असं मृत केबल व्यावसायिकाचे नाव आहे. शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास सचिन नाईक हे शेतामध्ये गेले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.  कोयत्याने सात ते आठ वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून कळते. तसंच, सचिन नाईक यांची त्याच्याच मित्रानेच ही हत्या केल्याचे बोलले जात आहे. गाडीतून उडी मारली अन् वाचला जीव समोर आला बर्निंग कारचा थरारक VIDEO सचिन नाईक यांच्या हत्येची माहिती मिळताच  नालासोपारा पोलीस आणि वसई क्राईम ब्रांचचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सचिन नाईक यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ही हत्या नेमकी पैशांच्या व्यवहारातून की केबल व्यवसायातून किंवा अन्य कोणत्या कारणाने झाली असल्याचा पोलीस शोध घेत आहे. याप्रकरणी पोलिसांनी  एकाला ताब्यात घेतले असल्याचेही सूत्रांकडून कळते. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. नवी मुंबईत अनधिकृत हुक्का पार्लरवर धाड दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी  एका बारवर धाड टाकली असून अनधिकृत हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे. यात तब्बल 211 तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेनं शनिवारी रात्री ही कारवाई केली आहे. शहरातील कॅफे पाम अटलांटिस (Cafe Palm Atlantis bar)या बारवर ही कारवाई करण्यात आली. कॅफे पाम अटलांटिस बारमध्ये अनधिकृतपणे हुक्का पार्लर सुरू होता. शनिवारीचा सुट्टी दिवस असल्यामुळे बारमध्ये हुक्का पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. माझ्या नवऱ्याची बायको! पत्नीनेच लावून दिलं आपल्या पतीचं गर्लफ्रेंडसोबत लग्न त्यानंतर पोलिसांनी या बारवर छापा टाकला. तेव्हा गर्दी पाहून पोलीसही हैराण झाले. या बारमध्ये जंगी हुक्का पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये तब्बल 211 तरुण, तरुणींचा समावेश होता. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या बारवर अनधिकृतपणे हुक्का चालवणे, गर्दी जमवणे, कोरोनाच्या परिस्थितीत नियमांचे उल्लंघन प्रकरणी बारवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. बारवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे नवी मुंबईत मात्र, खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या