फोटो - फेसबुक
अपहरणाच्या अनेक घटना दररोज वृत्तपत्रात वाचायला मिळतात. काही प्रकरणांचा छडा तत्काळ लावला जातो. काही जणांना यात आपला जीवही गमवावा लागतो. अपहरण झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा प्रचंड छळ केला जातो. परंतु या छळाची परीसीमा ओलांडणारी एक घटना 33 वर्षांपूर्वी घडली होती. लहानपणी अपहरण झालेल्या कॅटी बियर्स या महिलेने तिच्या झालेल्या अनन्वित छळाबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं. बालपणात तिच्यावर बेतलेल्या प्रसंगावर कॅटीने एक पुस्तकही लिहिलं आहे. ‘आज तक’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. कॅटीचा जन्म 30 डिसेंबर 1980 रोजी न्यूयॉर्कच्या बे शोर शहरात झाला. तिचं बालपण दुःखातच गेलं. वयाच्या नवव्या वर्षी आई सोडून निघून गेली. त्या वेळी तिच्या आईच्या ओळखीची लिंडा इंगहिलेरी ही महिला मदतीसाठी पुढे आली. लिंडाने कॅटीला तिच्या घरात आश्रय दिला. परंतु, काही दिवसांतच लिंडाचं खरं रूप समोर आलं. ती कॅटीचा छळ करू लागली. एखाद्या मोलकरणीप्रमाणे ती कॅटीला वागवत होती. तिला घराबाहेर जाण्याची परवानगी नव्हती आणि लहानसहान गोष्टीवरून मारहाणही व्हायची. कॅटीने कधी शाळेचं तोंडही पाहिलं नाही. शेजारच्यांशीही तिला बोलू दिलं जात नव्हतं. कॅटीचे कोणीही मित्र-मैत्रिणी नव्हते. शेजारी असणाऱ्या मुला-मुलींना खेळताना पाहून कॅटीलाही त्यांच्यासोबत खेळावंसं वाटायचं; पण लिंडा परवानगी देत नव्हती. लिंडाचा पती करायचा लैंगिक छळ कॅटी लिंडाच्या घरी कसेबसे दिवस काढत होती. लिंडाचा पती सॅल्वातोर कॅटीचा लैंगिक छळ करायचा. तेव्हा कॅटीला याबद्दल फारसं कळायचं नाही व सॅल्वातोरच्या भीतीनं ती शांत बसत होती. दुसरीकडे कुठे राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे नाईलाजास्तव हा छळ तिला सहन करावा लागायचा. कॅटीने शेजाऱ्यांकडे व्यक्त केलं दु:ख सॅल्वातोरच्या वर्तनाबद्दल कॅटीने लिंडाला अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, लिंडा काही ऐकून घ्यायची नाही. उलट ती कॅटीलाच रागवायची. आपलं दुःख कुणासमोर मांडावं, असा प्रश्न तिच्यासमोर होता. तेव्हा तिची ओळख जॉन एस्पोसितोशी झाली. जॉन हा लिंडाचा शेजारी होता. त्यामुळे तो नेहमी घरी ये-जा करत असे. जॉन कॅटीलाही खूप जीव लावायचा. कॅटीसाठी बऱ्याचदा चॉकलेट आणि गिफ्ट तो घेऊन येत होता. त्यामुळे कॅटीने तिचं दुःख जॉनसमोर मांडलं. परंतु जॉनही आपला अनन्वित छळ करणार आहे, याची पुसटशी कल्पनाही तिला आली नाही. फिरवण्याच्या बहाण्याने केलं अपहरण ‘डेली मेल’नं दिलेल्या वृत्तानुसार, 28 डिसेंबर 1992 या दिवशी लिंडाने कॅटीला घराबाहेर हाकलून दिल. तेव्हा ती जॉनच्या घरी पोहोचली आणि ओक्साबोक्शी रडत होती. घडलेला प्रसंग तिनं जॉनला सांगितला. त्यानं तिला धीर दिला व दोन दिवसांत तुझा वाढदिवस असून आपण फिरू येऊ असं त्यानं तिला सांगितलं. जॉन तिला मेळ्यात फिरवण्यासाठी घेऊन गेला. कॅटीने तिथं खूप मजा केली. रात्र झाल्यानंतर पुन्हा ती दोघं जॉनच्या घरी परतली. तिथूनच कॅटीच्या अपहरणाची सुरुवात झाली. त्याच दिवशी रात्री कॅटीने लिंडाला फोन करून आपलं अपहरण होत असल्याचं सांगितलं होतं. ‘काहीही करून मला वाचव,’ अशी याचना तिने लिंडाकडे केली होती. कॅटीचं फोनवरचं बोलणं ऐकून लिंडाच्या पायाखालची वाळू सरकली. फोन कट होताच लिंडा व तिचा पती सॅल्वातोर हे दोघे थेट पोलिस ठाण्यात पोहोचले. तिथं त्यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनीही तपास सुरू केला होता. जॉन कॅटीला घेऊन मेळ्यामध्ये गेल्याचं पोलिसांना माहिती झालं. त्या ठिकाणी जाऊन सर्व तपास करण्यात आला; पण कॅटीचा काही ठावठिकाणा लागत नव्हता. पोलिसांनी शेजाऱ्यांकडे केली विचारपूस कॅटी सापडत नसल्यानं पोलिसांनी जॉनच्या शेजारच्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. लिंडाच्या भीतीने कॅटी कोणाशीही बोलत नव्हती, असं शेजाऱ्यांनी सांगितलं. कॅटीबद्दल लिंडा, सॅल्वातोर आणि जॉन हे तीनच जण सांगू शकतात, असं शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं; पण कॅटीबद्दल माहिती मिळू शकली नाही. 17 फूट खोल तळघरात कॅटीला डांबलं पोलिसांनी जॉनलच्या घरात शोध घेणं सुरू केलं. जॉनने कॅटीला एका खोल तळघरामध्ये डांबून ठेवलं होतं. त्याची रुंदी 2 फूट असून 17 फूट खोली होती. त्यातच त्याने कॅटीला डांबलं होतं. आवाज बाहेर येऊ नये यासाठी जॉनने बेसमेंटमधलं तळघर साउंडप्रूफ बनवलं आणि आतमध्ये टीव्हीही ठेवला होता. कॅटीला आतमध्ये डांबून तो तळघर बंद करत असे आणि त्यावर दीडशे किलोचा दगड त्याने ठेवला होता. मातीतून झिरपणारं पाणी पिऊन काढले दिवस कॅटी सापडत नसल्याने त्या वेळी सर्व वृत्तपत्रांमध्येही तिच्या बेपत्ता होण्याच्या बातम्या प्रकाशित होत होत्या. कॅटी मात्र तळघरामध्ये कसेबसे दिवस काढत होती. जेवण देणं तर दूर, जॉन तिला पिण्यासाठी पाणीसुद्धा देत नव्हता. परंतु कॅटी हिंमत हरली नाही. तळघरात मातीत झिरपणाऱ्या पाण्याचा थेंब थेंब पिऊन तिने आपली तहान भागवली. भूक लागायची तेव्हा ती तीच माती खात होती. पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अनेक दिवस कॅटी सापडली नाही, तरी पोलिसांनी तपास सुरूच ठेवला होता. जॉनचं वर्तन संशयास्पद असल्याचं शेजारी पोलिसांना सांगत होते. त्यामुळे त्याच्यावरच संशयाची सुई होती. पोलिस ठाण्यात त्याला चौकशीसाठी बोलावलं जात होतं. आपलं कृत्य उघडं पडेल, अशी शक्यता जॉनला जाणवली. तेव्हा तो घरी जाऊन रोज तळघरातजायचा आणि कॅटीला मृत्युमुखी पडलं असल्याचा सोंग घेण्यास सांगायचा. कॅटी निपचित पडलेला फोटो त्याला घ्यायचा होता. ती मृत्युमुखी पडली आहे असं दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता. परंतु त्याची चाल कॅटीने ओळखली आणि फोटो काढण्यास स्पष्ट नकार दिला. तळघरात आनंदी असल्याचा केला दिखावा एक ना एक दिवस पोलिस आपल्याला शोधून काढतील, असा विश्वास कॅटीला होता. त्यामुळे ती हिंमत हरली नाही. तब्बल पाच दिवस जेवण न मिळाल्याने कॅटी अशक्त झाली होती. दुसरा कुठला मार्ग नसल्याने कॅटीने जॉनची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तळघरांमध्ये आपण आनंदी असल्यासारखं त्याला ती दाखवू लागली. एकदा तर ती जॉनला म्हणाली की, ‘अंकल तुम्ही लग्न करायला हवं. तुम्ही रोज असंच करत असाल तर एके दिवशी माझा मृत्यू होईल आणि ही बाब उघड झाल्यास तुमचं आयुष्यही संपणार आहे.’ हे तिने जॉनच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. जॉनलाही ती गोष्ट पटली. त्यामुळे जॉन कॅटीला जेवण देऊ लागला. परंतु जेवण देऊन तो आपल्याला मारेल या भीतीने कॅटीने जेवण्यास नकार दिला. त्यानंतर जॉन तेथून निघून गेला होता. पोलिसांना जॉनवरच होता दाट संशय बराच प्रयत्न करून कॅटीचा थांग पत्ता लागत नसल्यानं हे प्रकरण दुसऱ्या एका पोलिस ऑफिसरकडे सोपवलं गेलं. डिटेक्टिव्ह ऐरॉन नावाच्या अधिकाऱ्याने त्याच्या पथकासोबत तपासाला सुरुवात केली. कॅटी गायब होण्यामागे घरातलाच कोणी सदस्य असावा असा ठाम विश्वास त्या अधिकाऱ्याला होता. त्या दृष्टीनेच तपासाला सुरुवात करण्यात आली किती बेपत्ता असताना लिंडा आणि सॅल्वातोर हे घरीच होते. त्यामुळे अपहरणामध्ये या दोघांचा हात नसल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. आता पोलिसांना फक्त जॉनवर संशय होता. सगळ्यात शेवटी जॉनच कॅटीला घेऊन फिरायला गेल्याचे पोलिसांना माहिती होते. जॉन याला नकार देत असताना पोलिसही काही करू शकत नव्हते. कारण त्यांच्याकडे ठोस पुरावा नव्हता. परंतु, जॉनने कॅटीचं अपहरण केल्याचं पोलिसांना वाटत होतं. हेही वाचा - Shraddha Case: अखेर श्रद्धाच्या मृतदेहाच्या हाडांमधून सत्य उघड, आता आफताबचा फास आवळणार सहा वर्षांपूर्वीही जॉनने रचला होता अपहरणाचा डाव कॅटीला शोधत असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. जॉनने सहा वर्षांपूर्वीही शॉपिंग मॉलमधून एका सात वर्षीय मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आले. परंतु, त्या वेळी पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडलं होतं. या प्रकरणात त्याने शिक्षाही भोगली होती. दुसरीकडे पोलिस तपास करत असताना कॅटीचा पत्ता लागत नव्हता. कॅटी मृत्युमुखी पडली असेल असा समज पोलिसांनी करून घेतला होता. कॅटीची होत होती उपासमार कॅटीने अगदी हुशारीने जॉनच्या डोक्यात लग्नाची गोष्ट भरवली होती. जॉन आता लग्नाबद्दल गांभीर्यपूर्वक विचार करू लागला. कॅटी उपाशी राहिली आणि तिचा मृत्यू झाला तर आपण लग्न करू शकणार नाही असे जॉनला वाटू लागलं. अपहरणाच्या 17 दिवसानंतर जॉन आपल्या वकिलाच्या घरी पोहोचला आणि कॅटी आपल्याकडे आहे असं त्याने वकिलाला सांगितलं. वकील जॉनला घेऊन पोलिस ठाण्यात गेले. तिथे त्याने 17 दिवसांपासून तळघरामध्ये कॅटीला डांबून ठेवल्याचे कबूल केले. आता कदाचित ती मृत्युमुखी पडली असेल असेही त्याने पोलिसांना सांगितले. त्याचं हे वाक्य ऐकताच पोलिसांचं पथक जॉनच्या निवासस्थानी तळघरांमध्ये पोहोचलं. सुदैवाने कॅटी जिवंत होती. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपासमार झाल्यामुळे ती अशक्त झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. रुग्णालयात तिच्यावर काही दिवस उपचार झाले. त्यानंतर एका दाम्पत्याने कॅटीला दत्तक घेतलं. दुसरीकडे अपहरणाच्या गुन्ह्यात कोर्टाने जॉनला 15 वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर 2013मध्ये जॉनचा मृत्यू झाला. पुस्तक लिहून मांडली छळाची कहाणी न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, या घटनेनंतर वीस वर्षांनी कॅटीने एक मुलाखत दिली. यात तिनं चुकीचे काम करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा मिळाली आणि त्याचा मृत्यू झाला त्याबद्दल आनंद व्यक्त केला. या मुलाखतीत कॅटीने सर्वांसाठी एक संदेश दिला. त्यात ती म्हणते, की प्रसंग कितीही कठीण असो, आपण धीर कायम ठेवायला हवा. तरच त्यावर मात करता येऊ शकते. कॅटीने तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगावर ‘Buried Memories : Katie Beers’ हे पुस्तकही लिहिलं आहे. आता तिचं लग्न झालं असून, पती आणि दोन मुलांसह ती आनंदी जीवन जगत आहे.