JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / क्राईम / Indian Couple Died in America: रुद्रवार दाम्पत्यामध्ये नेमकं काय घडलं? US मीडियामधील बातम्यांमुळे गूढ वाढलं

Indian Couple Died in America: रुद्रवार दाम्पत्यामध्ये नेमकं काय घडलं? US मीडियामधील बातम्यांमुळे गूढ वाढलं

Maharashtrian Couple Found Dead in US: मयत बालाजी यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची सून आरती सात महिन्यांची गर्भवती होती. त्यांनी आत्महत्या केली की खून झाला असा संशय वाढत असताना US Media मधील अहवाल गूढ वाढवणारे आहेत

0108

नोकरीनिमित्त अमेरिकेत न्यू जर्सीमधील (New Jersey) अर्लिंग्टन भागात वास्तव्यास असलेल्या अंबाजोगाई येथील तरूण दाम्पत्याचा काल रात्री संशयास्पद मृत्यू (Ambajogai Couple Found Dead in America) झाला. या पती-पत्नीचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

जाहिरात
0208

स्थानिक वेळेनुसार बुधवारी सायंकाळी त्यांची चार वर्षीय मुलगी विहा गॅलरीत बराच वेळ एकटीच रडत थांबल्याचे दिसून आल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलील घटनास्थळी दाखल झाले, त्यावेळी त्यांना घरात बालाजी आणि आरती यांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आले.

जाहिरात
0308

बालाजी भारत रूद्रवार (वय 32) आणि आरती बालाजी रूद्रवार (वय 30) अशी या मयत पती-पत्नीची नावं आहेत. या घटनेने परिसरात आणि अंबाजोगाईमध्ये देखील त्यांच्या अशा अचानक मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. या दाम्पत्याची चार वर्षीय मुलगी मात्र सुखरूप आहे.

जाहिरात
0408

या घटनेने अर्लिंगटन परिसरात तर खळबळ उडालीच पण त्याचबरोबर अंबाजोगाईमध्ये राहणाऱ्या त्यांच्या इतर कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे. पण गूढ तेव्हा वाढलं आहे जेव्हा काही काही अमेरिकन माध्यमांनी ही आत्महत्या नव्हे खून असल्याचं म्हटलं आहे. धारधार शस्त्राने वार केल्याचे या अहवालात म्हटले आहे.

जाहिरात
0508

एका मीडिया अहवालात असे म्हटले आहे की, नवऱ्यानेच त्याच्या पत्नीच्या ओटीपोटात शस्त्राने वार केला. त्यावेळी आरतीने त्याच्या हल्ल्यातून वाचण्याचा अयशस्वी प्रयत्न देखील केला. द विकने दिलेल्या वृत्तानुसार US Media अहवालांमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे.

जाहिरात
0608

अमेरिकेच्या काही स्थानिक वृत्तपत्रांनी असे म्हटले आहे की, काउंटी प्रॉसिक्यूटर ऑफिसकडून प्रसिद्धीसाठी देण्यात आलेल्या माहितीनुसार दिलेल्या वृत्तानुसार पोलीस अधिकाऱ्यांना या दाम्पत्याच्या घरात सक्तीने घुसले. अर्थात घराचा दरवाजा आतून बंद होता. या अहवालात असे म्हटले आहे की, तपास यंत्रणा वैद्यकीय अहवालाच्या प्रतीक्षेत आहे जेणेकरून मृत्यूचे कारण समजेल. पण या दाम्पत्याच्या मृत्यू शस्त्राने वार केल्यामुळे झाल्याचे निश्चित असल्याचे या अहवालात आहे. दरम्यान अटॉप्सी अहवाल आल्यानंतर पोलीस याबाबतचा निष्कर्ष सांगतील अशी माहिती बालाजी यांचे वडील भारत रुद्रवार यांनी दिली आहे. भारतीय वेळेनुसार गुरूवारी 8 एप्रिल रोजी सकाळी 9 वा . तिथल्या पोलिसांनी या घटनेबाबत भारत रुद्रवार यांना फोनवरून माहिती दिली

जाहिरात
0708

भारत रुद्रवार यांनी अशी माहिती दिली आहे त्यांची सून सात महिन्यांची गर्भवती होती. शिवाय दोघांचे कुटुंब आनंदी कुटुंब होते, शेजारही चांगला होता. आता त्यांची नात बालाजी यांच्या मित्राबरोबर आहे. रुद्रवार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा मृतदेह भारतात पोहोचायला साधारण 8-10 दिवस जाण्याची शक्यता आहे.

जाहिरात
0808

शवविच्छेदनानंतरच या दाम्पत्याने आत्महत्या केली किंवा त्यांचा खून झाला हे स्पष्ट होऊ शकणार आहे. यासंदर्भात केज आंबेजोगाई मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला असून बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी देखील या संदर्भात अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाशी यांच्याशी संपर्क केला आहे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या