JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / लातूरमध्ये खून आणि चोरी केली अन् मुंबईजवळच्या शहरात जाऊन लपला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लातूरमध्ये खून आणि चोरी केली अन् मुंबईजवळच्या शहरात जाऊन लपला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलिसांनी सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लातूर, 26 ऑक्टोबर : लातूर येथे चोरी व खुनाचा गुन्हा दाखल असलेला आरोपी भिवंडी शहरालगतच्या खोणी खाडीपार या भागात लपून बसल्याची माहिती  स्थानिक निजामपुरा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोहसीन अब्दुल हसिफ शेख उर्फ बाबा पठाण असं आरोपीचं नाव आहे . निजामपुरा पोलीस ठाणे हद्दीतील एकता चौक फैजान अपार्टमेंट, खाडीपार येथे आरोपी आपली ओळख लपवून राहिला असल्याची माहिती  निजामपुरा पोलीस ठाणे पोलीस शिपाई निळकंठ खडके यांना प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांना कळवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सापळा रचून कारवाईकेली. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी तपास पथक तयार करून तपास पथक अधिकारी व अंमलदार तसेच गोपनीय अंमलदार यांनी सापळा रचला. त्यानंतर सदर इसमास सुपर गार्डन हॉटेल, एकता चौक, खाडीपार भिवंडी येथून ताब्यात घेण्यात आलं. त्याची विचारपूस केली असता त्याने लातूर जिल्ह्यात एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे खून तसेच औसा पोलीस स्टेशन येथे जबरी चोरी असे गुन्हे केले असल्याचे कबूल केले. सदर घटनेबाबत संबंधित पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील माहिती घेतली असता सदर इसमाविरुद्ध त्याने सांगितल्या प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची बाब उघड झाली. त्यामुळे आरोपी मोहसीन अब्दुल हसिफ शेख उर्फ बाबा पठाण यास  पोलीस ठाणे, निजामपुरा, भिवंडी येथे ताब्यात  घेत संबंधित पोलीस ठाण्यास कळवंण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या