JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / दुचाकी चोरीचा होता संशय, 10 ते 12 जणांच्या टोळक्याने दोघांचे केले अपहरण आणि...

दुचाकी चोरीचा होता संशय, 10 ते 12 जणांच्या टोळक्याने दोघांचे केले अपहरण आणि...

रविवारीच्या दिवशी मलंगगड भागातील मांगरूळ गावच्या शिवारात एक अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला होता.

जाहिरात

बाळ जेव्हा श्वास घेऊ शकत नव्हतं, तेव्हा त्यांनी आपात्कालिन क्रमांकावर फोन करुन बाळाला रुग्णालयात दाखल केलं. यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. शिकागो पोलिसांनी बाळाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उल्हासनगर, 30 सप्टेंबर : मोटारसायकल चोरी केल्याच्या संशयातून दोघांचे अपहरण करून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर  हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. तर यात एकजण गंभीर जखमी आहे. रविवारीच्या दिवशी  मलंगगड भागातील मांगरूळ गावच्या शिवारात एक अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. रविवारी रात्री चिंचपाडा हद्दीतील साई  पूजा हॉटलमध्ये काम करणारे राजू थापा, रोशन थापा आणि भरत परियार  यांचं काही अज्ञात 10 ते 12 जणांच्या टोळीने मोटारसायकल चोरी केल्याच्या संशयातून अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केली. वाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडीत बसून मारहाण करत मलंगगडच्या दिशेने नेले. राजू याला बेदम मारहाण करून नांदिवली चौकात सोडून दिले. परंतु, भरत याला नेवाळीच्या दिशेने नेउन मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. भरतचा मृतदेह हा नेवाळी आणि मांगरूळ गावाकडे जाणाऱ्या रोडजवळ फेकून देण्यात आला होता. याप्रकरणी राजू थापा याच्या तक्रारी वरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या