JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / कोरोना संकटात युवराज सिंगचा पुढाकार, गरजूंना अशी करणार मदत

कोरोना संकटात युवराज सिंगचा पुढाकार, गरजूंना अशी करणार मदत

टीम इंडियाचा माजी ऑल राऊंडर युवराज सिंह (Yuvraj Singh) कोरोना संकटात गरजूंच्या मदतीसाठी पुढे आला आहे. युवराजनं त्याच्या युवीकॅन (YouWeCan) फाऊंडेशनच्या माध्यमातून मदतीची घोषणा केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 जून : टीम इंडियाचा माजी ऑल राऊंडर युवराज सिंह (Yuvraj Singh) कोरोना संकटात गरजूंच्या मदतीसाठी पुढे आला आहे. युवराजनं त्याच्या युवीकॅन (YouWeCan) फाऊंडेशनच्या माध्यमातून मदतीची घोषणा केली आहे. या माध्यमातून देशभरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी 1000 बेड्सची सुविधा देण्यात येणार आहे. युवराजच्या फाऊंडेशननं वन डिजिटल एन्टरटेन्मेंटच्या सहकार्यानं ही योजना सुरू केली आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनसह बेड्स, व्हेंटीलेटर तसंच उपचारासाठी अन्य सर्व वैद्यकीय उपकरणं देण्याचा निर्णय युवराजनं घेतला आहे. सरकारी, खासगी, धर्मदाय आणि लष्करी हॉस्पिटलमधील वैद्यकीय सेवांना हातभार लावण्याचा या योजनेचा उद्देश आहे. ‘आपण सर्वांनी प्रिय व्यक्तींना गमावले आहे. तसेच असंख्य लोकांना ऑक्सिजन, आयसीयू बेड्स आणि दुसऱ्या वैद्यकीय गोष्टींच्या पूर्ततेसाठी संघर्ष करावा लागत आहे. याची मला जाणीव आहे. या विषयावर अथक प्रयत्न करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करण्याची माझी इच्छा आहे. त्याचबरोबर यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारनेही पुढाकार घ्यावा.’ असे आवाहन युवराजने केले आहे.

संबंधित बातम्या

‘आपण तरुणांना गमावतोय आणि ज्यांनी आपलं आयुष्य जगलंय त्यांना वाचवतोय’ युवराज सिंहच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून दिल्ली, NCR, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील हॉस्पिटल्समध्ये बेड्सची सूविधा सुरु करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या