JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Corona Vaccine: सीरमची लस सुरक्षित, आता जगभरात वापरास परवानगी

Corona Vaccine: सीरमची लस सुरक्षित, आता जगभरात वापरास परवानगी

कोरोना लस (Corona Vaccine) आता जगातील गरीब देशांमध्ये कोरोनाविरूद्ध लढ्यासाठी वापरली जाईल.जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी कोरोना लसीच्या आपात्कालीन वापरास मान्यता दिली आहे.

जाहिरात

सर्वात पहिले कुणाला ही लस द्यायची यावरही विचार सुरू आहे. लहान मुलांना वगळून पहिले जास्त धोका असलेल्या ज्येष्ठांना ही लस द्यायची का यावरही विचार सुरू आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 16 फेब्रुवारी : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) तयार केलेल्या कोरोना लसीच्या (Corona Vaccine) आपात्कालीन वापरास मान्यता दिली आहे. यासह आता ही लस जगातील गरीब देशांमध्ये कोरोनाविरूद्ध लढ्यासाठी वापरली जाईल.जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी कोरोना लसीच्या आपात्कालीन वापरास मान्यता दिली आहे. या दोन्ही लसी ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकानं तयार केल्या आहेत. एक वॅक्सिन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट तर दुसरं दक्षिण कोरियाची एसके बायो कंपनी बनवते. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानॉम म्हणाले, की या ग्रीन सिग्नलमुळे लसीकरणाच्या कार्यक्रमांतर्गत जगभरातील गरीब देशांना लस देण्याचा रस्ता खुला झाला आहे. जगभरातील निर्धन देशांना जागतिक आरोग्य संघटनेमार्फत कोरोनाची लस पाठवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाच्या दोन लसींच्या आपात्कालीन वापरास परवानगी दिली आहे. WHOच्या म्हणण्यानुसार, जिथे अजूनही कोरोनाची लस पोहोचलेली नाही आणि जिथे अजूनही मोठ्या प्रमाणात लोक कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत, अशा ठिकाणी लसीकरणाला सुरुवात केली जाईल. जागतिक आरोग्य संघटना वॅक्सिनच्या वापराला परवानगी देण्याआधी त्याच्या सुरक्षिततेच्या गुणवत्तेचा अभ्यास करते. त्यामुळे, संघटनेनं दिलेल्या परवानगीनंतर आता याच्या वापराबद्दल मनात संभ्रम असलेले देशही लवकरच लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करतील. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटलं, की भारत आणि दक्षिण कोरियातील दोन कंपनी एकाच लसीचं उत्पादन करत असले तरी दोन्ही प्लांट वेगळे असल्यानं त्यांची वेगवेगळी चाचणी करून परवानगी देण्यात आली आहे. WHOच्या म्हणण्यानुसार, वॅक्सिनला परवानगी देण्याची प्रक्रिया निर्मात्यांकडून संपूर्ण संशोधन कागदपत्रं मिळाल्यानंतर केवळ 4 आठवड्यात पूर्ण करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या