JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / WHO Report on Wuhan: वुहान दौऱ्यावेळी WHO नं केली पहिल्या कोरोना रुग्णासोबत चर्चा

WHO Report on Wuhan: वुहान दौऱ्यावेळी WHO नं केली पहिल्या कोरोना रुग्णासोबत चर्चा

जागतिक आरोग्य संघटनेच्या मिशनचे प्रमुख शोधकर्ता पीटर बेन एम्ब्रेक म्हणाले, की 2019 मध्येच कोरोनाच्या प्रसाराचे संकेत मिळाले होते. त्यांनी सांगितलं, की वुहान दौऱ्याच्यावेळी (WHO Report on Wuhan) त्यांना कोरोनाच्या पहिला रुग्णासोबत बोलण्याची संधी मिळाली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 06 फेब्रुवारी : जगभरात थैमान घातलेला कोरोना (Covid-19) विषाणूचा संसर्ग नेमका पसरला कुठून याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. याच पार्श्वभूमीवर जागितक आरोग्य संघटनेच्या (WHO) विशेषतज्ज्ञांच्या टीमनं चीनचा दौरा केला आहे. आता यावर बोलताना WHO चीफ टेडरॉय अधनॉम म्हणाले, की 15 मार्चच्या आसपास याबद्दलचा रिपोर्ट (WHO Report on Wuhan) कधीही सार्वजनिक केला जाऊ शकतो. सुरुवातील हा रिपोर्ट दोन भागात सार्वजनिक केला जाणार होता. फेब्रुवारी महिन्यात लहान स्वरुपात आणि नंतर मोठ्या रुपात. मात्र, आता दोन्हीही रिपोर्ट सोबतच पब्लिश केले जाणार आहेत. टेडरॉस म्हणाले, मला माहिती आहे संयुक्त राष्ट्राचे सदस्य या रिपोर्टची आतुरतेनं वाट पाहात आहेत. टीम या रिपोर्टला अंतिम रुप देत आहे. वुहानमध्ये कोरोनाचा आउटब्रेक जितना जगाला दिसला त्यापेक्षा अतिशय मोठा होता. अनेक देशांनी कोरोनावरील लस बनवली आहे, मात्र कोरोनाची सुरुवात कशी झाली हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. काही दिवसांपूर्वी WHO च्या एका टीमनं कोरोनाचा प्रसार वुहानच्या लॅबमधून झाल्याचा दावाही फेटाळला होताय मात्र, संघटनेला सुरुवातीचा डेटा उपलब्ध करून न दिला गेल्यानं चीनवर प्रश्न उपस्थित होत होते. एक्सपर्ट टीममधील एका सदस्यानी असाही दावा केला होता, की वुहानमध्ये कोरोनाचा आउटब्रेक जितका दाखवला गेला त्यापेक्षा खूप मोठा होता. सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत जागतिक आरोग्य संघटनेच्या मिशनचे प्रमुख शोधकर्ता पीटर बेन एम्ब्रेक म्हणाले, की 2019 मध्येच कोरोनाच्या प्रसाराचे संकेत मिळाले होते. त्यांनी सांगितलं, की वुहान दौऱ्याच्यावेळी त्यांना कोरोनाच्या पहिला रुग्णासोबत बोलण्याची संधी मिळाली होती. त्याचं वय जवळपास 40 वर्ष इतकं होतं आणि त्यानं प्रवासही केला नव्हता. 8 डिसेंबरला तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या