JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / रशियाने बनवली जगातील पहिली कोरोना लस; सुरक्षिततेबाबत WHO ने दिली महत्त्वाची माहिती

रशियाने बनवली जगातील पहिली कोरोना लस; सुरक्षिततेबाबत WHO ने दिली महत्त्वाची माहिती

जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization) या लशीच्या सुरक्षिततेवर याआधीच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

जाहिरात

या औषधाच्या चाचण्या या पूर्णपणे सुरक्षीत असल्याचं MHRAने म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने या चाचण्या थांबिण्यात आल्या होत्या.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मॉस्को, 11 ऑगस्ट : संपूर्ण जग ज्या दिवसाकडे डोळे लावून बसलं होतं, तो दिवस अखेर आलाच. रशियाने कोरोना लस (russian corona vaccine) तयार केली आणि त्याला आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली. इतकंच नव्हे तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लशीचा डोस दिला असल्याचं सांगितलं. रशियाचा हा दावा खरा असेल तर ही लस जगातील पहिली कोरोना लस असेल. आतापर्यंत कोणत्याही देशाला लशीची अंतिम चाचणी करण्यात यश आलेले नाही आहे. त्यामुळे ही आनंदाची बातमी आहे, मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं याआधीच या लशीच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. रशियन आरोग्य मंत्रालयाशी संबंधित असलेल्या गमलेया संशोधन संस्थेनं ही लस तयार केली आहे. रशियाने लस बनवण्यासाठी गाइडलाइन्सचं पालन केलेलं नाही, त्यामुळे लशीच्या यशस्वीतेवर विश्वास ठेवणं कठीण असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं. रशियाने कोरोना लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल केलेलं नाही. कोणतीही लस तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल न करताच त्याच्या उत्पादनासाठी परवाना दिला जात असेल तर हे धोकादायक ठरू शकतं, असं WHO च्या प्रवक्त्या क्रिस्ट्रियन लिंडमियर (Christian Lindmeier) यांनी यूएन पत्रकार परिषदेत सांगतिलं होतं. हे वाचा -  पहिली Corona Vaccine रशियामध्ये लॉंच, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मुलीला दिली लस क्रिस्टियन लिंडमियर म्हणाल्या, “अनेकदा काही संशोधक दावा करतात की त्यांनी नवा शोध लावला आहे आणि ही चांगली बातमी असते. जेव्हा अशा लशींबाबत बातम्या येतील किंवा अशी पावलं उचलली जातील तेव्हा आपल्याला सावध राहायला हवं. अशा बातम्यांबाबत तथ्यता पडताळून घ्यायला हवी. एखादा शोध लावणं किंवा लस परिणामकारक असल्याचे संकेत मिळणं आणि क्लिनिकल ट्रायलच्या सर्व टप्प्यांमधून जाणं यामध्ये खूप मोठा फरक आहेत. आम्हाला अधिकृतरित्या असं काहीच दिसलं नाही. तर अधिकृतरित्या असं काही झालं असतं तर युरोपमधील आमच्या सदस्यांनी याकडे जरूर लक्ष दिलं असतं” “एक सुरक्षित लस तयार करण्यासाठी अनेक नियम तयार करण्यात आले आहेत आणि याबाबत गाइडलाइन्सदेखील आहेत. याचं पालन करणं गरजेचं आहे जेणेकरून लस किंवा कोणताही उपचार किती परिणामकारक आहे आणि कोणत्या आजाराविरोधात लढण्यात मदत करू शकेल हे आपल्याला समजू शकेल. गाइडलाइन्सचं पालन केल्यानं आपल्याला एखादा उपचार किंवा लशीचे दुष्परिणाम काय आहेत तेदेखील समजतं” हे वाचा -  मास्क की फेस शिल्ड; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी काय वापरणं योग्य? जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्या वेबसाइटवर क्लिनिक ट्रायल सुरू असलेल्या 25 लशींची यादी तयार केली आहे. आतापर्यंत 139 लशी प्री-क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या