JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / कोरोनाकाळातही लग्नात भलतीच गर्दी, पोलीस येताच भिंतीवरुन उडी घेत नवरी-नवरदेवानं ठोकली धूम

कोरोनाकाळातही लग्नात भलतीच गर्दी, पोलीस येताच भिंतीवरुन उडी घेत नवरी-नवरदेवानं ठोकली धूम

एका वरातीमध्ये विनापरवानगी 150 ते 200 लोक जमा झाले. या गोष्टीची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले. या लग्नात नवरी-नवरदेवासह उपस्थित पाहुणे मास्क (Mask) आणि सोशल डिस्टन्सिंगच्या (Social Distancing) नियमांचा फज्जा उडवत असल्याचं चित्र होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमृतसर 14 मे : कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रसार पाहाता लग्नसमारंभासाठी (Marriage Function) खूप कमी लोकांना परवानगी देण्यात येत आहे. पंजाब **(Panjab)**सरकारनंही लग्नासाठी नवरी आणि नवरदेव यांच्याकडून दहा लोकांना उपस्थित राहाण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठीही जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून परवानगी घेणं आवश्यक आहे. मात्र, असं असतानाही काही लोक मात्र नियम (Covid Guidelines) पायदळी तुडवत असल्याचं पाहायला मिळत आहे. पटियालाच्या राजपूर टाउनमध्ये असलेल्या कमेटी सेंटरमध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला. इथे आलेल्या एका वरातीमध्ये विनापरवानगी 150 ते 200 लोक जमा झाले. या गोष्टीची माहिती मिळताच स्वतः एसएचओ पोलीस फोर्ससोबत घटनास्थळी दाखल झाले. या लग्नात नवरी-नवरदेवासह उपस्थित पाहुणे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडवत असल्याचं चित्र होतं. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, की यावेळी पोलिसांना समोर पाहाताच मॅरेज हॉलमध्ये एकच गोंधळ उडाला आणि सगळे इकडे-तिकडे पळू लागले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लग्नात 150 ते 200 लोक सहभागी झाले होते. मात्र, नवरीबाईच्या आईचं असं म्हणणं आहे, की लग्नात केवळ वीस लोक उपस्थित होते. पोलिसांनी दोन्हीकडच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितलं, की या सर्वांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. पंजाबमध्ये लग्न समारंभासाठी प्रचंड गर्दी होत असल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. नुकतंच अशाच एका प्रकरणात पोलिसांनी नवरदेव आणि त्याच्या आजोबांना ताब्यात घेतलं होतं. कोरोना नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पंजाबमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे,

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या