सोलापूर, 1 ऑगस्ट : देशभरात तिसऱ्या लाटेची भीती आहे. केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येची मोठी वाढ झाल्यामुळे सर्व राज्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे अद्यापही राज्यभरात पूर्णत: लॉकडाऊन उठविण्यात आलेला नाही. तर 11 जिल्ह्यांमधील निर्बंध अधिक कडक केले आहे. अशातच सोलापूरातील आलेला एक व्हिडीओ चिंता वाढवणारा आहे. अद्यापही राज्यात मास्कमुक्ती झालेली नाही. मात्र सोलापूरातील या व्हिडीओमध्ये नागरिक विमामास्क फिरत असल्याचं दिसून आलं. ( Solapurkars have no fear of corona Big crowd without masks ) सोलापुरात कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आलं आहे. सोलापुरातील कर्णिक नगर येथील ही घटना आहे. यावेळी शहरात एक ते दीड हजार लोकांनी धार्मिक कार्यक्रमात गर्दी केली होती. या कार्यक्रमात लहान मुलांपासून ते वृद्धांची गर्दी पाहायला मिळाली. आषाढ महिन्यात या भागात म्हशी पळविण्याच्या कार्यक्रम केला जातो. कोरोनाची तिसऱ्या लाटेची भीती असतानाही येथे या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे या कार्यक्रमात अनेकांच्या तोंडावर मास्क नसल्याचं दिसून आलं. हे ही वाचा- Maharashtra unlock: निर्बंध शिथिल होणार; लोकल, मॉल्स, थिएटर सुरू होणार?
केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, ओडिशा, आसाम, मिझोराम, मेघालय, आंध्र प्रदेश आणि मणिपूर या राज्यांतल्या परिस्थितीचा कोविड-19चा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (31 जुलै) बैठक आयोजित करण्यात आली होती. या राज्यांतल्या आरोग्य विभागाकडून कोविड-19चं (Covid19) सर्वेक्षण आणि व्यवस्थापनासाठी राबवण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. या राज्यांमध्ये दररोज एक तर रुग्णसंख्या तरी वाढते आहे किंवा पॉझिटिव्हिटी दरही वाढतो आहे.