JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / जूनमध्ये होणार कोरोनाचा उद्रेक; टीबी तपासणीच्या मशीनने होणार कोरोना टेस्ट

जूनमध्ये होणार कोरोनाचा उद्रेक; टीबी तपासणीच्या मशीनने होणार कोरोना टेस्ट

ट्रू नेट मशीनमार्फत एका दिवसात 15 हजार कोरोना सॅम्पल टेस्टिंग होऊ शकतात, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पूजा माथूर/भोपाळ, 23 मे : सध्या कोरोनाव्हायरसच्या निदानासाठी आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते. मात्र त्याचा रिपोर्ट येण्यासाठी भरपूर कालावधी लागतो. आता मध्य प्रदेश सरकारनं टेस्टचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रू-नेट मशीनने कोरोनाची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. जूनमध्ये राज्यात कोरोनाची प्रकरणं वाढतील, असा अंदाज आरोग्य विभागाला आहे. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी आतापासूनच राज्य सरकारनं तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत कोरोना टेस्टसाठी मध्य प्रदेशमधील बहुतेक जिल्ह्यांना मोठ्या शहरांवर अवलंबून राहवं लागत होतं. सॅम्पल्सचं प्रमाण वाढल्यानंतर रिपोर्ट येण्यासही उशीर होऊ लागला. रिपोर्ट येण्यासाठी कित्येक आठवडे लागत असतं. त्यामुळे सॅम्पल्स दिल्लीसह इतर राज्यांमध्ये पाठवले जात असतं. आता जूनमध्ये कोरोना प्रकरणं वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे राज्य सरकारनं आता कंबर कसली आहे. हे वाचा -  जूनमध्ये होणार कोरोनाचा उद्रेक; टीबी तपासणीच्या मशीनने होणार कोरोना टेस्ट प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाचे सॅम्पल टेस्ट करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात ट्रू-नेट मशीन लावण्यात येत आहेत. ICMR नेदेखील ट्रूनेट मशीनद्वारे कोरोना टेस्ट करण्यासाठी मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारनं मध्य प्रदेश सरकारला 69 ट्रूनेट टेस्टिंग मशीन दिल्यात. या मशीन प्रत्येक जिल्ह्यात पोहोचवल्या जाणार आहेत.  इंदोर, भोपाळ, जबलपूर, ग्वालियर आणि उज्जैन यासारख्या रेड झोनमध्ये 3-3 मशीन पाठवल्या जाणार आहेत. या मशीनमार्फत दिवसाला 10 ते 15 हजार सॅम्पल टेस्ट होऊ शकता. आधी फक्त स्क्रिनिंग टेस्ट म्हणून या मशीनला मंजुरी देण्यात आली होती. तर कन्फर्म टेस्टसाठी सॅम्पल मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले जात होते. आता स्क्रिनिंग आणि कन्फर्म टेस्ट याच मशीनमार्फत होणार आहेत. हे वाचा -  पुण्यात कोरोना रुग्णाबाबत धक्कादायक प्रकार, केवळ 5 दिवसात दिला डिस्चार्ज तज्ज्ञांच्या मते, ही मशीन टीबीच्या चाचणीसाठी वापरली जाते. कोरोना टेस्टसाठी यामध्ये ट्रूनेट चिप लावावी लागेल. त्यानंतर यामार्फत कोरोनाची चाचणी होऊ शकते. हे मशीन इन्स्टॉल करण्याची जबाबदारी जिल्हा सीएमएचओंना सोपवण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या