JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / सस्पेन्स वाढला, रत्नागिरीतला तो मृत्यू कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा? RTPCR ची येणार मोठी अपडेट

सस्पेन्स वाढला, रत्नागिरीतला तो मृत्यू कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा? RTPCR ची येणार मोठी अपडेट

मंडणगड येथील संशयित कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात

FILE PHOTO

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रत्नागिरी, 27 डिसेंबर : देशासह राज्यात पुन्हा एकदा आता कोरोनाची चर्चा होत आहे. चीनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे भारतातही चार रुग्ण आढळले आहेत. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रातही काळजी घेतली जात आहे. राज्यातील अनेक प्रमुख मंदिरांत मास्कसक्ती करण्यात आली आहे. त्यातच आता रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंडणगड येथील संशयित कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान या संशयित कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा अखेर मृत्यू झाला. त्याचा आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल उद्या रात्रीपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या कोरोना रुग्णाचा दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या रुग्णाला दमा व अस्थमाचा पूर्वीपासून त्रास होता आणि गेल्या काल रात्रीपासून या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान या रुग्णाची अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली असली तरी आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल उद्या रात्रीपर्यंत मिळण्याची शक्यता जिल्हा शल्यचिकित्सक संघमित्रा फुले यांनी वर्तवली आहे. दरम्यान, लोकांनी घाबरून जाऊ नये, जिल्ह्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट दाखल झाला आहे का, हे मात्र आरटीपीसीआर अहवालानंतर स्पष्ट होईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. हेही वाचा -  #BF7Variant Coronavirus : कोरोना पुन्हा येतोय, लसीच्या चौथ्या डोसची आवश्यकता आहे का? कोरोना उद्रेकात चांगली बातमी! नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची किंमत ठरली - कोरोनाच्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने नाकावाटे देण्यात देणाऱ्या लसीची (Coronavirus Nasal Vaccine Price) किंमत निश्चित केली आहे. या निर्णयानंतर कोरोनाला सामोरे जाण्यात आणखी वेग येईल. केंद्र सरकारने जीएसटीसह नाकातील लसीची किंमत 840 रुपये निश्चित केली आहे. वास्तविक, नेझल लसीची किंमत 800+ 5% GST सह रु. 840 असेल. सध्या सरकारने ठरवून दिलेली ही किंमत आहे. पण भारत बायोटेक कंपनीला लसीची किंमत ₹ 1000 ठेवायची आहे. ही लस सुरुवातीला खासगी रुग्णालयांमध्ये बूस्टर डोस म्हणून दिली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या