नवी दिल्ली 01 मार्च : आजपासून देशभरात लसीकरणाचं (corona vaccination) महाभियान सुरू झालं आहे. आज एक एप्रिलपासून देशात 45 वर्षावरील सर्व नागरिक लसीकरण केंद्रावर लस (Covid-19 Vaccine) घेऊ शकतात. इतकंच नाही तर आता कोणालाही कोणत्याही आजाराचं प्रमाणपत्रही दाखवावं लागणार नाही. केवळ आधार कार्ड (Aadhar card) किंवा मतदान कार्डसारखं (Voter ID Card) ओळखपत्र दाखवावं लागेल. कोरोना लसीकरण केंद्रावर (Vaccination Centers) लोकांमध्ये केवळ लसीबद्दल जागरुकता केली जात नाही तर लसीकरणादरम्यान घ्यावयाच्या काळजीबद्दलही मार्गदर्शन केलं जात आहे. लोकांना असंही सांगितलं जात आहे, की लस घेतल्यानंतर २५ ते ३० मिनीट केंद्रावरच थांबण गरजेचं आहे. लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी हा सल्ला दिला जात आहे. डॉ. अरोडा म्हणाले, की लसीकरणानंतर अधिक वय असणाऱ्या लोकांना अॅलर्जी होण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे लसीकरणानंतर लोकांनी अर्धा तास केंद्रावरच थांबावं असं सल्ला दिला जात आहे, कारण त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल. लसीकरणानंतर अॅलर्जीचं काही लक्षण दिसल्यास किंवा व्यक्तीची तब्येत बिघडल्यास त्याच्यावर तात्काळ उपचार करणं शक्य होईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार, कोरोना लसीकरणानंतरच्या रिअॅक्शनचं (Vaccine Reaction) दोन गटात विभाजन केलं गेलं आहे. यात हलके आणि गंभीर असे दोन प्रकार आहेत. लसीकरणानंतर त्याजागेवर सूज, दुखणं किंवा लाल पडणं ही लक्षण साधारण आहेत. यात ताप येणं, डोकेदुखी, भूक न लागणं आणि अंगदुखी यांचाही समावेश आहे. यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर अधिक परिणाम होत नाही आणि ते लवकरच ठीक होतात. गंभीर लक्षणांबद्दल बोलायचं झाल्यास, यात जीव गमवण्याचा धोका अधिक असतो. यात लस घेताच त्याची अॅलर्जिक रिअॅक्शन होते. लसीला शरीर प्रतिसाद देत नाही आणि त्यामुळे अशा घटना घडतात. म्हणूनच लस घेतल्यानंतर अर्धा तास केंद्रावरच बसून राहाणं गरजेचं असतं.