नवी दिल्ली 16 मे : देशात कोरोनाची (Corona) दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. केंद्र सरकारनं शनिवारी दिलासा देत सांगितलं आहे, की देशात कोरोना रुग्णांच्या (Corona Patient) संख्येत घट नोंदवली जात आहे. मात्र, सरकारनं दुसरीकडे ब्लॅक फंगस (Black Fungus) म्हणजेच म्यूकरमाइकोसिसबाबत (Mucormycosis) नागरिकांना सावध केलं आहे. कारण, यामुळेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा वाढला आहे. नीति आयोगाचे सदस्या डॉ. व्ही के पॉल म्हणाले, की ब्लॅक फंगस आटोक्यात आणण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे. डॉ. पॉल म्हणाले, की मधुमेह असणाऱ्यांना याचा जास्त धोका आहे. त्यामुळे, मधुमेह नियंत्रित करा, कारण यामुळे मृत्यूचा धोका अधिक वाढतो. हे तेव्हाच होत आहे जेव्हा कोरोना रुग्णाला स्टेरॉइड दिलं जातं आहे. त्यामुळे, स्टेरॉइट अतिशय जबाबदारीनं द्यायला हवं. ते म्हणाले, की ब्लॅक फंगसची प्रकरण झपाट्यानं वाढत आहेत आणि अनेक राज्यांमधून 400 ते 500 केस समोर आल्या आहेत. डॉ. पॉल म्हणाले, की या आजारासोबत कसं लढायचं याबाबत अधिक माहिती सध्या आपल्याला नाही. ही एक नवीन समस्या उभी ठाकली आहे आणि ICMR याबाबत डेटा जमा करत आहे. आम्ही राज्यांना यावर नजर ठेवण्यासह सांगितलं आहे. पोस्ट ग्रॅज्यूएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, चंदीगडमध्ये मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख असलेल्या डॉ. अरूणालोके चक्रवर्ती यांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यादरम्यान देशातील सोळा केंद्रांमध्ये आलेली ब्लॅक फंगसची प्रकरणं 2.5 पटीनं वाढली आहेत. डॉ. चक्रवर्ती फंगल इन्फेक्शन स्टडी फोरमचा भाग आहेत आणि त्या सदस्यांपैकी एक आहेत, ज्यांनी म्यूकरमाइकोसिसबाबत सरकारला सूचना आणि सल्ला देण्याचं काम केलं आहे. एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं, की गुजरातच्या रुग्णालयात ब्लॅक फंगसच्या प्रकरणांसाठी विशेष वॉर्ड तयार केले गेले आहेत. इथे वेगवेगळ्या डॉक्टरांची टीम आहे. तपासात असं समोर आलं आहे, की या सर्व रुग्णांना कोरोनावरील उपचारादरम्यान स्टेरॉइड दिलं गेलं होतं. यातील 90 ते 95 टक्के रुग्णांना मधुमेह आहे.