JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / सौरव गांगुलीच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना, मोठा भाऊ पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्यानेही केली चाचणी

सौरव गांगुलीच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना, मोठा भाऊ पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्यानेही केली चाचणी

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटाने संपूर्ण जगाला घेरले आहे. दरम्यान कोरोनाचे संकट माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या (Saurav Ganguly) घरापर्यंत देखील पोहोचले आहे.

0107

कोरोना व्हायरसच्या संकटाने संपूर्ण जगाला घेरले आहे. दरम्यान कोरोनाचे संकट माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या (Saurav Ganguly) घरापर्यंत देखील पोहोचले आहे.

जाहिरात
0207

सौरवचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. भाऊ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्याने देखील स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. दैनिक जागरणने दिलेल्या बातमीनुसार गांगुलीने देखील कोरोना टेस्ट करून घेतली आहे.

जाहिरात
0307

दिलासादायक बाब अशी की सौरवची कोरोना टेस्ट नेगिटिव्ह आली आहे. सौरव गांगुलीमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नव्हती. मात्र खबरदारी म्हणून त्याने ही टेस्ट करून घेतली आहे.

जाहिरात
0407

सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशिषवर कोलकातामधील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

जाहिरात
0507

दरम्यान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली सर्व कामकाज घरूनच पाहत आहे. BCCI च्या अधिकाऱ्यांशी त्याचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संभाषण सुरू असते.

जाहिरात
0607

दरम्यान सौरव गांगुलीशी संबंधित एक खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. गांगुलीला त्याच्या पदावर कायम ठेवण्याबाबत बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

जाहिरात
0707

गांगुली BCCIच्या अध्यक्षपदावर कायम राहिल की नाही याबाबतचा निर्णय नंतर होईल. मात्र त्याने आपल्या कार्यकाळात आयपीएल 2020 निश्चितपणे मंजूर केले आहे. टी -२० विश्वचषक स्थगित झाल्यानंतर आता आयपीएलची सुरुवात 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये होणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना नोव्हेंबरमध्ये होईल

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या