कोरोनाची पहिली लाट (First Wave of Cororna) ओसरण्या आधीच दुसरी लाट सुरु झाली. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची (Corona patient) संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यातच कोरोना बरोबर ब्लॅक फंगस (Black Fungus)चा धोकाही वाढलेला आहे. कोरोनानंतर आता ब्लॅक फंगसच्या केस संपूर्ण भारतामध्ये दिसू लागलेल्या आहेत.
मुंबई, 17 मे : आज राज्यात रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर ज्याची चिंता व्यक्त केली जात होती, त्या मृत्यूच्या संख्येतही मोठी घट पाहायला मिळत आहे. आज 48,211 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण 48,74,582 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 90.19% एवढे झाले आहे. आज राज्यात 26,616 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या 24 तासात 516 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.53% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,13,38,407 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,05,068 (17.25 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 33,74,258 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 28,102 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 4,45,495 सक्रिय रुग्ण आहेत. हे ही वाचा- तापाने फणफणलेल्या तरुणीला 15 ग्लुकोजच्या बाटल्या चढवल्या, काही तासातच मृत्यू राज्यातील रविवारी अॅक्टीव्ह असलेल्या रुग्णांचा आकडा 4 लाख 68 हजार 109 आहे. तर एकूण रुग्णसंख्या आतापर्यंत 54 लाखांच्या घरात पोहोचत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकूणच कोरोनाची रुग्णसंख्या पाहता आकडे दिवसेंदिवस कमी होत आहे. रविवारी राज्यामध्ये नव्याने नोंद झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 34 हजार 389 एवढी होती. तर कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ही 59 हजार 318 एवढी होती. राज्यातील रुग्णांच्या बरं होण्याचं प्रमाण पाहता ती टक्केवारी 89.74 एवढी झाली आहे. म्हणजे राज्याचा रिकव्हरी रेट दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं राज्याच्या दृष्टीनं ही दिलासादायक बाब आहे.