लसीकरणानंतर दुष्परिणाम झालेल्यांना सरकारी मदत
मुंबई 27 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या (Coronavirus in Maharashtra) दिवसेंदिवस वाढत असतानाच सोमवारी मात्र रुग्णसंख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर आता लसीकरणाबाबतही (Corona Vaccination) आणखी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात रेकॉर्ड 5 लाख लसीचे डोस दिले गेले आहेत. महाराष्ट्र लवकरच एकूण 1.5 कोटी लसी (Vaccine) देणारं पहिलं राज्य ठरू शकतं. याआधी रविवारी राज्यात लसीच्या डोसच्या तुटवड्यामुळे केवळ एक लाख लोकांचं लसीकरण केलं गेलं होतं. मात्र, पुरवठा सुरळीत होताच सोमवारी एका दिवसात पाच लाख जणांना लस दिली गेली. मात्र, लसीकरणासाठी गर्दी असल्यानं लोकांना चार ते पाच तास आपल्या नंबरसाठी वाटही पाहावी लागली. देशभरात कोरोना लसीचे 14.5 कोटीहून अधिक डोस आतापर्यंत दिले गेले आहेत. यातील 31 लाखाहून अधिक डोस सोमवारी दिले गेले आहेत. आरोग्य मंत्रालयानं सांगितलं, की सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंतच्या रिपोर्टनुसार, देशभरात लसीचे 14,50,85,911 डोस दिले गेले आहेत. यातील 31,74,688 डोस सोमवारी लसीकरणाच्या 101 व्या दिवशी दिले गेले आहेत. मंत्रालयानं सांगितलं, की सोमवारी 19,73,778 जणांना पहिला आणि 12,00,910 जणांना लसीचा दुसरा डोस दिला गेला. व्हेंटिलेटरवर असणाऱ्या कोरोनाबाधित आईनं दिला बाळाला जन्म, सुदै वानं दोघंही सुखरुप राज्यात मागील काही दिवसांच्या तुलनेत सोमवारी झालेल्या कोरोना मृतांच्या संख्येत घट नोंदवली गेली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 43 लाखाहून अधिक झाली आहे. तर, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही 65,000 च्या पुढे गेली आहे. राज्यात रविवारी सर्वाधिक 832 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सोमवारी यात घट होऊन 524 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 65,284 जणांचा कोरोनामुले मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक मृतांचा आकडा महाराष्ट्रात आहे. सोमवारी चोवीस तासात राज्यात 50,000 पेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. 18 एप्रिलला सर्वाधिक 68,631 रुग्णांची नोंद झाली होती. तर, सोमवारी 48,700 नवीन रुग्ण समोर आले आहेत.