JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Corona Vaccine: ...तर 'ही' लसच ठरतीये जीवघेणी; अभ्यासातून धक्कादायक खुलासा

Corona Vaccine: ...तर 'ही' लसच ठरतीये जीवघेणी; अभ्यासातून धक्कादायक खुलासा

कोरोना लशीमुळे (Corona Vaccine) रक्ताच्या गुठळ्या किंवा ब्लड क्लॉटिंग (Blood Clotting) झाल्याची काही प्रकरणं समोर येत आहेत. मात्र, हे अत्यंत घातक असू शकतं.

जाहिरात

तर, 2013 मध्ये झालेल्या रिसर्चनुसार कर्क्युमिनमध्ये फ्लेक्सोफिटॉल नावाचा घटक असतो. ज्यामुळे वेदना कमी होतात. तज्ज्ञांच्यामते युरिक ऍसिडवर नियंत्रण मिळवण्यासाठी हळदीचा वापर करता येतो.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन 13 ऑगस्ट : ऑक्सफोर्ड ऍस्ट्राझेनेकाच्या कोरोना लशीमुळे (Oxford-AstraZeneca Vaccine) रक्ताच्या गुठळ्या किंवा ब्लड क्लॉटिंग (Blood Clotting) झाल्याची काही प्रकरणं समोर येत आहेत. मात्र, हे अत्यंत घातक असू शकतं. या विषयावर पहिल्यांदाच केलेल्या अभ्यासानंतर (Study) शास्त्रज्ञांनी हा इशारा दिला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल एनएचएस फाउंडेशन ट्रस्टच्या डॉ सुई पॉवर्ड यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या टीमने लसीकरणानंतरच्या प्रकरणांचं विश्लेषण केलं. ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयाच्या लसीची भारतात कोविशिल्ड नावानं निर्मिती होत आहे. ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये (New England Journal of Medicine) प्रकाशित झालेल्या अभ्यासात, लसीकरणानंतरच्या रोगप्रतिकारक थ्रोम्बोसाइटोपेनिया थ्रोम्बोसिसच्या (व्हीआयटीटी) पहिल्या 220 प्रकरणांचा अभ्यास केला आणि असे दिसून आले की व्हीआयटीटीचा मृत्यू दर 22 टक्के आहे. प्लेटलेट्स कमी झाल्यास आणि रक्ताच्या गुठळ्या जास्त झाल्या तर मृत्यूचा धोका वाढतो. यासोबतच खूप कमी प्लेटलेट आणि रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यानंतर, रक्तस्त्राव होण्याचा धोका 73 टक्क्यांपर्यंत वाढतो. मात्र, या लशीबाबत हे प्रकार अत्यंत दुर्मिळ किंवा कमी असल्याचं पॉवर्ड यांनी म्हटलं. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं ठोठावला दरवाजा? एका आठवड्यात 300 मुलं Positive पॉवर्ड यांनी म्हटलं, की 50 वर्षाहून कमी वय असलेल्या आणि ही लस घेतलेल्या 50 हजार लोकांपैकी केवळ एकाच व्यक्तीमध्ये ही समस्या दिसून येते. मात्र, आमच्या अभ्यासात असं दिसलं आहे, की व्हीआयटीटी विकसित झाल्यास हे अत्यंत धोकादायक आहे. तरुण आणि निरोगी लोकांमध्ये हे सर्व दिसण्याची शक्यता अत्यंत कमी आहे, मात्र याचा मृत्यूदर अधिक आहे. तीन महिन्यापूर्वी भयानक परिस्थिती, आता या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या Zero व्हीआयटीटी थ्रोम्बोटिक सिंड्रोम आहे, जे कोरोना लशीसोबत संबंधीत आहे. रक्त रोग तज्ज्ञांनी सांगितलं, की मागील तीन ते चार आठवड्यांमध्ये व्हीआयटीटीचं नवं प्रकरण समोर आलेलं नाही. पॉवर्ड यांनी सांगितलं, की व्हीआयटीटी नवं सिंड्रोम आहे आणि आम्ही त्याच्यावरील प्रभावी उपचारासाठी अजूनही काम करत आहोत. याच्यावरील अभ्यासामुळे चांगली उपचारपद्धती शोधण्यास मदत होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या