कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ
दिल्ली, 18 मार्च : देशाची चिंता वाढवणारी एक बातमी समोर येत आहे. ते म्हणजे पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. कोरोनाची लाट ओसरी असं वाटत असतानाच पुन्हा एकदा राज्यासह देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा पाच हजारांवर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांमध्ये देशभरात एकूण 796 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4.46 कोटींवर केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांमध्ये एकूण 796 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसामध्ये एवढ्यामोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची नोंद झाल्यानं देशात 109 दिवसांनंतर प्रथमच सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहे. तर देशात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 4.46 कोटींवर पोहोचला आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क कोरोनाची लाट ओसरली आहे असं वाटत असताना पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 796 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा पाच हजारांवर पोहोचला आहे. कोरोनासोबतच एच3 एन2 चा देखील प्रादुर्भावर वाढल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याचं पहायला मिळत आहे.