JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / लस न घेतलेल्यांच्या मृत्यूचं प्रमाण दहापट अधिक, वाचा नव्या संशोधनातील ठळक बाबी

लस न घेतलेल्यांच्या मृत्यूचं प्रमाण दहापट अधिक, वाचा नव्या संशोधनातील ठळक बाबी

कोरोना लसींचं (corona vaccine) महत्त्व अधोरेखित करणारा एक निष्कर्ष (research) नुकताच एका संशोधनातून समोर आला आहे.

जाहिरात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

न्यूयॉर्क, 12 सप्टेंबर : कोरोना लसींचं (corona vaccine) महत्त्व अधोरेखित करणारा एक निष्कर्ष (research) नुकताच एका संशोधनातून समोर आला आहे. जगातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोनाची दुसरी आणि तिसरी लाट धुमाकूळ घालत असताना हा महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आला आहे. या प्रयोगातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार कोरोनाची लस घेतलेल्या नागरिकांच्या (Vaccinated citizens) तुलनेत लस न घेणाऱ्या नागरिकांच्या (non vaccinated citizens) मृत्यूचं (Death) प्रमाण हे दहापट (10 times more) अधिक असल्याचं सिद्ध झालं आहे. अमेरिकेत झाला प्रयोग युएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेनं अमेरिकेतील विविध भागांत हा प्रयोग केला आहे. यासाठी 13 विविध राज्यं आणि शहरांतील 6 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांचे रिपोर्ट्स, त्यांच्या आजारांचं गांभीर्य, हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं प्रमाण आणि मृत्यूचे आकडे या बाबींचं सर्वेक्षण केलं. 4 एप्रिल ते 17 जुलै या कालावधीत 18 वर्षांवरील नागरिकांचे नमुने यासाठी तपासण्यात आले. त्यातून समोर आलेल्या निष्कर्षांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या नागरिकांच्या मृत्युचं प्रमाण हे लस न घेतलेल्यांच्या तुलनेत लक्षणीयरित्या कमी आढळून आलं आहे. लसींची घटती परिणामकारकता कोरोना लसींची परिणामकारकता सुरुवातीला 90 टक्के होती. मात्र डेल्टाच्या प्रसारानंतर ती कमी होत जाऊन 80 टक्क्यांवर आल्याचं निरीक्षणही यात नोंदवण्यात आलं आहे. विशेषतः ज्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं, त्यातील लस न घेतलेल्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण हे लस घेतलेल्यांच्या तुलनेत अधिक असल्याचं दिसून आलं. हे वाचा - Shocking! कोरोनाबाबत चीनला निर्दोष ठरवणारे बहुतांश शास्त्रज्ञ वुहानशी संबंधित मॉडर्ना अधिक प्रभावी कोरोनाबाबत केल्या गेलेल्या आणखी एका विश्लेषणात मॉडर्नाची लस ही फायझर आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या तुलनेत अधिक प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी नैसर्गिकरित्या शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडिज या सर्वाधिक प्रभावी असल्याचा निष्कर्ष नुकताच समोर आला होता. मात्र या नव्या निष्कर्षामुळे कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी लसीकरण करून घेणे, हाच उत्तम उपाय असल्याचं दिसून आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या