JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / भारतात Coronavirus तिसऱ्या टप्प्यात पोहोचला की नाही? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

भारतात Coronavirus तिसऱ्या टप्प्यात पोहोचला की नाही? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

कोरोनाव्हायरसचं कम्युनिटी ट्रान्समिशन (coronavirus community transmission) रोखण्यात भारत आतापर्यंत यशस्वी झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

जाहिरात

Mumbai: People at a market to buy essential items during day-2 of a nationwide lockdown, imposed in the wake of coronavirus pandemic, at Dongri Market, in Mumbai, Thursday, March 26, 2020. (PTI Photo)(PTI26-03-2020_000265B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 05 मे : भारतात कोरोना (india coronavirus) रुग्णांचा आकडा 46 हजार पार गेला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. मात्र भारतात कोरोनाव्हायरस तिसऱ्या टप्प्यात पोहोचू नये म्हणजे कोरोनाव्हायरसचं कम्युनिटी ट्रान्समिशन होऊ नये यासाठी लॉकडाऊनसारखं कठोर पाऊल सरकारनं उचललं आणि त्याला यश मिळताना दिसत आहे. भारतात कोरोनाव्हायरसचं कम्युनिटी ट्रान्समिशन (community transmission) झालेलं नाही, अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. भारत आतापर्यंत कोरोनाव्हायरसच्या सामुदायिक प्रसाराला रोखण्यात यशस्वी झाला आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणालेत.

संबंधित बातम्या

तसंच कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे लोकांच्या सवयींमध्ये जे बदल झालेत, ते कोरोनाव्हायरसवर नियंत्रण मिळवल्यानंतरही निरोगी समाजाच्या जीवनशैलीचा एक भाग होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. हे वाचा -  आधी H1N1 आणि आता COVID-19; ‘त्या’ राज्यात कोरोनाने स्वाइन फ्लूलाही मागे टाकलं आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, कोरोनाव्हायरशी लढा देणं सोपं नाही हे आतापर्यंत आपल्याला समजलं आहे. अशा कठीण परिस्थितीत ज्याप्रकारे आपण धुत आहोत, स्वच्छतेच्या सवयींचं पालन करत आहोत, याच सवयी जर समाजानं आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवल्या तर हा एक सकारात्मक बदल असेल. कोरोनाव्हायरसचं संकट गेल्यानंतरही अशा सवयी कायम राहिल्या तर भविष्यात जेव्हा या महासाथीकडे पाहिलं जाईल तेव्हा याच सवयी वाईट परिस्थितीत ठरलेल्या वरदान मानल्या जातील. काय आहे कोरोनाव्हायरसचा तिसरा टप्पा? कम्युनिटी ट्रान्समिशन, हा असा टप्पा ज्यामध्ये आपण जाऊ नये, यासाठी सरकार कठोर अशी पावलं उचलत आहे. या टप्प्यामध्ये कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीने परदेश प्रवास केलेला नसतो किंवा परदेशाहून आलेल्या अशा कोणत्याही व्यक्तीशी तिचा संपर्क आलेला नसतो. एकंदर त्या व्यक्तीला व्हायरसची लागण नेमकी कुठून आणि कशी झाली, याचा धागादोरा सापडत नाही व्हायरसचा स्रोत समजत नाही आणि व्हायरस सर्वत्र पसरू लागतो. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा -  बापरे! देशात 24 तासांत सर्वात जास्त 3900 नवे रुग्ण आणि 195 जणांचा मृत्यू

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या