JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / महाराष्ट्रासह 12 राज्यांतील Oxygenचा तुटवडा होणार दूर, Modi सरकारने घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्रासह 12 राज्यांतील Oxygenचा तुटवडा होणार दूर, Modi सरकारने घेतला मोठा निर्णय

Modi Government import 50,000 MT of medical oxygen: कोरोनाच्या संकटात देशातील विविध राज्यांत वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या बिकट परिस्थितीत मोदी सरकारने ऑक्सिजन आयात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 एप्रिल: संपूर्ण देशभरात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. वाढत्या कोरोना बाधित रुग्ण संख्येमुळे वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा (Medical Oxygen shortage) निर्माण होऊ लागला आहे. महाराष्ट्रातही ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. संपूर्ण देशभरातील वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता मोदी सरकारने (Modi Government) महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशभरातील सर्वाधिक कोरोना बाधित सक्रिय रुग्ण असलेल्या 12 राज्यांतील कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय ऑक्सिजन महत्वाचा भाग आहे. महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच दिवसेंदिवस ऑक्सिजनची मागणी वाढू लागली आहे. वैद्यकीय ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता सरकारने 50,000 मेट्रिक टन ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा काढण्याचाही निर्णय घेतला आहे. यासोबतच ईजी 2 ने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला आणखी 100 रुग्णालयामध्ये पीएसए प्लान्टची निर्मिती करण्यास मंजूरी देण्याची सूचना केली आहे. वाचा:  राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 60 हजार पार, पण बरे होण्याचे प्रमाणही वाढले वैद्यकीय ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या या 12 राज्यांना 4880 मेट्रिक टन, 5618 मेट्रिक टन आणि 6593 मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा क्रमश: 20 एप्रिल, 25 एप्रिल आणि 30 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. कोविड परिस्थितीत अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे आणि ऑक्सिजनची उपलब्धता याविषयी अधिकारीक गट 2 (EG2) ची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. कोविड बाधित राज्यांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनसह अत्यावश्यक वैद्यकीय साधनांचा सुरळीत पुरवठा रहावा यासाठी ईजी 2 गेल्या वर्षभऱापासून सातत्याने लक्ष ठेवून असून वेळोवेळी उद्भवणाऱ्या आव्हानांची दखल घेऊन त्यांचे निराकरण करत आहे. राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा सुरळीत रहावा यासाठी ईजी 2 सातत्याने ऑक्सिजन उत्पादकांसोबत संवाद साधत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या