JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Corona vaccine side effect : Pfizer कोरोना लस घेतल्यानंतर 5 तासांतच मारला लकवा! आता डोळाही बंद होईना

Corona vaccine side effect : Pfizer कोरोना लस घेतल्यानंतर 5 तासांतच मारला लकवा! आता डोळाही बंद होईना

कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर या व्यक्तीची प्रकृती आणखीनच बिघडली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ब्रिटन, 20 जुलै : कोरोना लस घेतल्यानंतर सौम्य दुष्परिणाम (Side Effects Of Corona Vaccine)  दिसून येतात. कुणाला ताप येतो, स्नायूंमध्ये वेदना, लस घेतलेल्या भागाला सूज आणि वेदना, अशक्तपणा अशी लक्षणं तर दिसू लागतात. पण काही प्रकरणात गंभीर परिणामही समोर येत आहेत. नुकतंच कोरोना लस घेतल्यानंतर एका व्यक्तीला लकवा मारला. 5 तासांतच त्याचं शरीर पॅरालाइझ झालं. 61  वर्षांच्या या व्यक्तीने फायझरची कोरोना लस  (Pfizer Vaccine) घेतली होती. त्याने लशीचे दोन्ही डोस घेतले. पहिला डोस घेतल्यानंतरच त्याची तब्येत बिघडू लागली होती. दुसरा डोस घेतल्यानंतर त्याची तब्येत आणखी खराब झाली. त्याला लकवा मारला. द सन च्या रिपोर्टनुसार ब्रिटिस मेडिकल जर्नलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की, फाइझरची लस घेतल्यांतर या व्यक्तीची प्रकृती बिघडली. लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर पाच तासांनी त्याच्या चेहऱ्याचा एक भाग लकवाग्रस्त झाला आणि एक डोळाही पूर्णपणे बंद होत नाही आहे. त्याला बेल्स पाल्सी (Bell’s Palsy) झाल्याचं निदान झालं. बेल्स पाल्सी म्हणजे काय? बेल्स पाल्सी हा शरीरातल्या स्नायूंशी निगडित असलेला अर्धांगवायूसदृश (Paralysis) विकार आहे. अर्धांगवायूमध्ये अर्धं शरीर निकामी होतं. बेल्स पाल्सीमध्ये चेहरा एका बाजूने लटकल्यासारखा होतो. पेशंटला गाल फुगवण्यास, गालाची हालचाल करण्यास त्रास होतो. याचा डोळ्यांच्या पापण्यांवर आणि भुवयांवरही परिणाम होतो. डोळ्यांच्या पापण्या मिटलेल्या किंवा अर्धोन्मीलित राहतात. हे वाचा -  चिंताजनक! लसीकरण झालेल्या महिला डॉक्टरला Coronaच्या दोन व्हेरिएंटची लागण हा विकार होण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही; मात्र काही संशोधकांच्या म्हणण्यानुसार, शरीरात प्रवेश केलेल्या विषाणूशी किंवा रोगाशी संघर्ष करण्यासाठी शरीराची जी प्रतिकार यंत्रणा काम करते, तिच्या ओव्हररिअॅक्शनमुळे (Over Reaction) चेहरा किंवा विशिष्ट अवयव सुजतो. त्याचा परिणाम स्नायूंवर होऊन ते निकामी होतात. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हा त्रास उद्भवल्यावर दोन महिन्यांत यावर योग्य उपचार करण्यात आले, तर हा विकार लवकर बरा होऊ शकतो. यातून बाहेर येण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधीही लागू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे वाचा -  ‘‘कोरोनाशी लढण्यासाठी मुलांची Immunity मजबूत, शाळा सुरु करा’’ बहुतेक लोक नऊ महिन्यांतच पूर्णपणे बरे होतात. पण यापेक्षा अधिक कालावधी लागू शकतो किंवा कायमचा लकवा मारू शकतो. दरम्यान उपचारानंतर संबंधित रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या