JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / कडकनाथच्या नावानं चांगभलं! कोरोना काळात रोगप्रतिकार शक्तीसाठी उपयुक्त असल्याचा दावा

कडकनाथच्या नावानं चांगभलं! कोरोना काळात रोगप्रतिकार शक्तीसाठी उपयुक्त असल्याचा दावा

कडकनाथ रिसर्च सेंटर आणि कृषि विज्ञान केंद्राने केलेल्या दाव्यानुसार कडकनाथ कोंबडी ही फॅट आणि कोलेस्ट्रॉल फ्री असल्याचही सांगण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 जुलै : केवळ महाराष्ट्रचं नाही तर कडकनाथ कोंबडीची चर्चा अख्ख्या देशात होत असते. आता पुन्हा एकदा कडकनाथचा जलवा लोकांना पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशातील झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटर आणि कृषि विज्ञान केंद्राने केलेल्या दाव्यानुसार कडकनाथ कोंबडीचं मांस खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यासंदर्भातील पेपर्स त्यांनी इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्चला पाठवले आहेत. (Kadaknath chicken is claimed to be useful for boosting immunity during Corona period ) यात कडकनाथ कोंबड्यांच्या मांसातून प्रोटीन, विटामिन, झिंक आणि लो फॅट मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच कोलेस्ट्रॉल फ्री असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशातील झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटर आणि कृषि विज्ञान केंद्राने केलेल्या दाव्यानुसार कडकनाथ कोंबडी ही फॅट आणि कोलेस्ट्रॉल फ्री असल्याचही सांगण्यात आलं आहे. यामुळे वजन वाढीचं टेन्शनही नाही. झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटर आणि कृषि विज्ञान केंद्राने पाठविलेल्या पत्रावर नॅशनल मीट रिसर्च सेंटर आणि मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आलेला अहवालच्या प्रतीही जोडण्यात आल्या आहेत. हे ही वाचा- VIDEO : लशीच्या तुटवड्याला वैतागली जनता; केंद्रावरच तोडफोड, अधिकारीही हैराण

संबंधित बातम्या

अद्याप आयसीएमआरने याबाबत काहीच वक्तव्य केलेलं नाही. त्यानुळे कडकनाथच्या कोंबड्यांमुळे खरंच कोरोनाकाळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयोग होतो की नाही हे अस्पष्ट आहे. कोरोना काळात रुग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे आजार बळावतो. त्यामुळे गेल्या काही महिन्यात रोग प्रतिकाशक्ती वाढविणाऱ्या औषधांचाही खप वाढला आहे. अशा वेळी तर कडकनाथच्या कोंबड्यांमधून रोगप्रतिकारशक्ती मिळत असल्याचं सिद्ध झालं तर घरांमध्ये लोक दररोज आवडीने चिकनच्या रस्त्यावर ताव मारताना दिसतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या