JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / GOOD NEWS! कोरोनाचं औषध झालं स्वस्त; फक्त 39 रुपयात मिळणार एक टॅबलेट

GOOD NEWS! कोरोनाचं औषध झालं स्वस्त; फक्त 39 रुपयात मिळणार एक टॅबलेट

सौम्य आणि मध्यम लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांसाठी वापरलं जाणारं औषध आता आणखीनंच स्वस्त झालं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जुलै : कोरोना रुग्णांवर सध्या वेगवेगळ्या औषधांनी उपचार (Coronavirus treatment) केले जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे फेविपिरावीर (Favipiravir). जपानच्या औषध कंपनीने तयार केलेलं हे औषध भारतातही तयार होऊ लागलं. भारतातील काही औषध कंपन्यांनी वेगवेगळ्या नावाने हे औषध तयार केलं आहे आणि भारतीयांसाठी स्वस्त किंमतीत उपलब्ध करून दिलं आहे. आता हे औषध इतकं स्वस्त झालं की एक टॅबलेट फक्त 39 रुपयात उपलब्ध होणार आहे. जेनबर्ट फार्मास्युटिकल (Jenburkt Pharmaceuticals) कंपनीने फेविवेंट (Favivent) या नावाने फेविपिरावीरचं औषध लाँच केलं आहे. विशेष म्हणजे या औषधाच्या एका टॅबलेटची किंमत फक्त 39 रुपये आहे. एका पाकिटात 10 टॅबलेट असतील, असं कंपनीने सांगितलं आहे. याआधी ब्रिन्टॉन औषध कंपनीने फेविटॉन म्हणून हे औषध लाँच केलं आहे. ज्याची किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये आहे. तर ग्लेनमार्क कंपनीने फॅबिफ्लू म्हणून हे औषध विकत आहे. ज्याची किंमत प्रति टॅबलेट 75 रुपये आहे. हे वाचा -  30 वर्षीय व्यक्तीला दिली COVAXIN; परिणामांबाबत AIIMSने दिली महत्त्वाची माहिती जेनबर्ट कंपनीचे चेअरमन एमडी आशिष यू भुटा यांनी सांगितलं, “भारतात कोरोनाव्हायरससारख्या गंभीर आजाराचं संकट आणि त्यात उद्भवलेली आर्थिक परिस्थिती पाहता समाजाचा एक भाग म्हणून आम्ही औषध कंपन्यांनीही बदलणं गरजेचं आहे. सामाजिक दृष्टीकोनातून समाजहिताचे निर्णय घेणं आवश्यक आहे. फेविवेंटसारखं सहज आणि स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या औषधामुळे भारतीयांना वेळेत आणि आवश्यक असलेले उपचार मिळण्यास मदत होईल, अशी आशा आम्हाला आहे” कोरोना लशीशिवाय तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवायला तयार आहात का? View Survey फेविपिरावीर हे जपानच्या औषध कंपनीने तयार केलेलं अँटिव्हायरल औषध आहे. इन्फ्लुएंझावरील उपचारासाठी हे औषध वापरलं जातं. भारतात सौम्य आणि मध्यम लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी हे औषध वापरण्यास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) परवानगी दिली आहे. हे वाचा -  अरे बापरे! आता CORONA आकार बदलून रोगप्रतिकारक प्रणालीला देतोय चकवा दरम्यान आगामी चार महिन्यात अजून काही औषधे उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी दिली आहे. सध्या भारतासह संपूर्ण जगामध्ये कोरोना लशीवर संशोधन सुरू आहे. जगात चार लशी या फ्रंटरनर आहेत. या सर्व लशींच्या तिसऱ्या टप्याच्या चाचणीचे निकाल आल्यानंतर सर्व सामान्य लोकांकरिता ही लस उपलबध्द होणार आहे. भारतात लस उत्पादन आणि वितरणाचे सुदृढ जाळे आहे. त्यामुळे लोकांपर्यंत ही लस पोहचण्याची अडचण येणार नाही, असंही डॉ. मांडे म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या