JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतली कोरोनाची लस, पाहा VIDEO

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतली कोरोनाची लस, पाहा VIDEO

लोकांना उदाहरण देण्यासाठी मला सर्वात पहिली लस घेणं आवश्यक होतं असं इस्रायलचे पंतप्रधान म्हणाले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : ब्रिटेन, रशियानंतर आता इस्रायलमध्ये देखील कोरोनाची लस देण्याबाबत चर्चा सुरू आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतत्याहून यांचा कोरोना लशीचा डोस घेतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. नेतन्याहू हे त्यांच्या देशातील पहिला व्यक्ती आहे ज्याला कोरोना अँटीव्हायरल लस दिली गेली. तसंच जगभरातील निवडक नेत्यांना दिलेल्या लशीच्या यादींमध्ये देखील त्यांच्या नावाचा समावेश झाला आहे. लोकांना उदाहरण देण्यासाठी मला सर्वात पहिली लस घेणं आवश्यक होतं. ज्याद्वारे लोकांना देखील कोरोनाची लस घेण्याची प्रेरणा मिळेल. ही लस घेतल्यानंतर पंतप्रधानांनी जनतेला संदेशही दिला आहे.

संबंधित बातम्या

ब्रिटेन आणि रशियामध्ये नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. तर भारतातही नव्या वर्षात कोरोनाची लस उपलब्ध होईल असं सांगितलं जात आहे. भारतात केंद्रीय मंत्रालयानं यासंदर्भात मोठी माहिती दिली आहे. हे वाचा- कोरोना काळात मेट्रोमोनियल साइट्सवर मुलींची फसवणूक, तरुणीसोबत नेमकं काय घडलं? केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं की, लोकांना घाबरुन जाण्याची गरज नाही. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका वक्तव्यात सांगितलं की, स्वदेशी लस तयार करण्यात आली आहे आणि आमच्याकडे 30 कोटी लशीकरणाची क्षमता असेल. भारतातील मृत्यू दर जगातील सर्वात कमी आहे, जो 1.45 टक्के आहे. संपूर्ण भारतात 16 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यासह त्यांनी सांगितले की, आमची वैज्ञानिक आणि आरोग्य तज्ज्ञ ही लस बनवण्याचे काम करत आहेत. या संदर्भात, जीनोम सिक्वेंसींग, कोरोना व्हायरस आयसोलेशन आणि स्वदेशी लस विकसित करण्यात आली आहे. ज्या 6 ते 7 महिन्यांत भारतात 300 दशलक्ष लोकांना लस देण्यास सक्षम असतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या