कॉव्हेन्ट्री, 26 मे: जगात पुरुषांमध्ये सर्वात पहिल्यांदा (1st Male to take Coronavirus Vaccine Jab) कोरोना व्हॅक्सिन घेणाऱ्या विल्यम शेक्सपिअर (William Shakespeare) यांचा मृत्यू झाला आहे. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या काही मिनिटं आधी मार्गारेट किनन या 90 वर्षीय आजीबाईंनी कोरोनाची लस घेतली होती. पुरुष गटात लस घेणारे विल्यम पहिले होते, तर पुरुष-महिला अशा एकत्र गटात लस घेणारे ते दुसरे आहेत. डिसेंबर 8, 2020 रोजी त्यांनी Pfizer-BioNTech ची कोरोना लस घेतली होती. 81 वर्षीय हे आजोबा त्यावेळी विशेष प्रसिद्ध झाले होते. युनिव्हर्सिटी हॉस्पिटल कॉव्हेन्ट्री याठिकाणी त्यांनी कोरोना व्हॅक्सिन (Coronavirus Vaccine) घेतलं. क्लिनिकल ट्रायलदरम्यान या दोघांनीही लशीचे डोस घेतले होते. आश्चर्याची बाब म्हणजे कॉव्हेंट्री हे स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-एव्हनपासून 20 मैलांच्या अंतरावर आहे, जे इंग्लंडचे महान नाटककार आणि कवी शेक्सपिअर यांचं जन्मस्थळ आहे. पुरुषांमध्ये पहिल्यांदा लस घेणाऱ्या विल्यम यांचं नाव आणि या महान कवीच्या नावात असणाऱ्या साधर्म्यामुळे अनेक स्थानिक मीडिया अहवालात हा संदर्भ देण्यात आला आहे. रोल्स रॉयसचे माजी कर्मचारी आणि तेथील रहिवासी काउन्सिलर असणाऱ्या शेक्सपियर यांचे दीर्घ आजारामुळे युनिव्हर्सिटी हॉस्पिटल कॉव्हेंट्री याठिकाणीच निधन झाले, अशी माहिती डेली मेलने दिली आहे. याच ठिकाणी त्यांनी लस घेतली होती. हे वाचा- कोरोना लस घेतल्यानंतर 2 वर्षात होणार मृत्यू? काय आहे या VIRAL दाव्यामागचं सत्य शेक्सपिअर यांच्या एका जवळच्या मित्रानं असं आवाहन केलं आहे की सर्वांनी कोरोना लस घ्यावी, हिच त्यांच्यासाठी श्रद्धांजली असेल. Jayne Innes यांनी ही पोस्ट केली आहे. त्यांच्या मते विल्यम विविध कारणांसाठी आठवणीत राहतील, एक म्हणजे त्यांचा खोडकरपणा. शेक्सपिअर यांनी तीन दशकं समाजसेवेसाठी दिल्याने त्यांच्या जाण्याने सर्वत्र दु:ख व्यक्त केलं जात आहे. West Midlands Labour संघाने देखील ट्वीट करत त्यांच्या मृत्यूनंतर ट्वीट करत श्रद्धांजली दिली आहे.
डिसेंबरमध्ये शेक्सपिअर यांनी लस घेतली होती. त्यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी अत्यंत समाधान व्यक्त केलं होतं. शिवाय रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळाल्याचं देखील सांगितलं होतं. शेक्सपिअर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि नातवंड असा परिवार आहे.