JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / मशिदीत सुरू केलं 50 बेड्सचं covid centre, रमझानच्या महिन्यात उचललं महत्त्वाचं पाऊल

मशिदीत सुरू केलं 50 बेड्सचं covid centre, रमझानच्या महिन्यात उचललं महत्त्वाचं पाऊल

देशात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave of Coronavirus) रौद्ररुप धारण करत आहे. देशात ऑक्सिजन, बेड्स, रेमडेसिव्हीर अशा अनेक महत्त्वाच्या घटकांचा तुटवडा आहे. खारीचा वाटा उचलून इतरांना मदत करणं आवश्यक आहे. गुजरातमधून देखील एक अशीच आशादायी बातमी समोर आली आहे

0106

देशात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave of Coronavirus) रौद्ररुप धारण करत आहे. देशात ऑक्सिजन, बेड्स, रेमडेसिव्हीर अशा अनेक महत्त्वाच्या घटकांचा तुटवडा आहे. अशावेळी धैर्याने काम करणं गरजेचं आहे. तसंच खारीचा वाटा उचलून इतरांना मदत करणं आवश्यक आहे. गुजरातमधील या मशिदीनं घेतलेला निर्णय यावेळी कौतुकास पात्र ठरत आहे

जाहिरात
0206

अशीच काहीशी परिस्थिती गुजरातमध्ये पाहायला मिळाली. गुजरामध्ये देखील कोरोना फोफावत आहे. दरम्यान याठिकाणी असणाऱ्या एका मशिदीने आदर्श घालून दिला आहे. (फोटो सौजन्य- ANI)

जाहिरात
0306

बडोदा याठिकाणी असणाऱ्या जहांगिरपुरा मशिदीचे 50 बेड्स असणाऱ्या कोव्हिड सेंटरमध्ये रुपांतरण करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य- ANI)

जाहिरात
0406

या मशिदीच्या ट्रस्टींनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'ऑक्सिजन आणि बेड्सच्या तुटवड्यामुळे, आम्ही मशिदीचे कोव्हिड फॅसिलिटीमध्ये रुपांतरण करण्याचा निर्णय घेतला आहे.' (फोटो सौजन्य- ANI)

जाहिरात
0506

त्यांनी पुढे अशी प्रतिक्रिया दिली आहे की, हा निर्णय घेण्यासाठी रमजान महिन्यापेक्षा काय चांगला काळ असेल. रमझानच्या महिन्यात हा निर्णय घेतल्याबद्दल मशिदीच्या ट्रस्टींनी आनंद व्यक्त केला आहे. (फोटो सौजन्य- ANI)

जाहिरात
0606

गुजरातमध्ये सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरू आहे. बडोदा हा राज्यातील चौथा सर्वाधिक बाधित जिल्हा आहे. येथे 41 हजाराहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या