JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / 'कापडी मास्क वापरणं टाळा', डॉक्टरांनी सांगितल्या हवेतून पसरणाऱ्या कोरोनापासून बचावाच्या सोप्या पद्धती

'कापडी मास्क वापरणं टाळा', डॉक्टरांनी सांगितल्या हवेतून पसरणाऱ्या कोरोनापासून बचावाच्या सोप्या पद्धती

हवेच्या माध्यमातूनदेखील कोरोनाचा प्रसार (Covid 19 Spreads Through Air) होत आहे. अशात नागरिकांनी कशाप्रकारे काळजी घ्यावी, याबद्दल डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.

जाहिरात

पावसळ्यातही बाहेर जाताना मास्क लावावा. बाहेर जाताना एक्सट्रा मास्क बरोबर ठेवा. पावसामुळे मास्क ओला किंवा दमट झाल्यास लगेच बदलावा. चेहरा आणि हात पुसण्यासाठी टीश्यूपेपरचा वापर करावा.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 18 एप्रिल : कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) जगभरात पसरली आहे. यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार इतक्या झपाट्यानं का होत आहे, याबाबत अनेक संशोधनं झाली आहेत. नुकतंच मेडिक जर्नल द लैंसेटनं सांगितलं, की हवेच्या माध्यमातूनदेखील कोरोनाचा प्रसार (Covid 19 Spreads Through Air) होत आहे. त्यांनी आपल्या अहवालात सांगितलं, की कशाप्रकारे कोरोना हवेतून पसरतो. यानंतर लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. आता याप्रकरणी मेरीलँड स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉक्टर फहीम यूनुस म्हणाले, की द लैंसेटच्या अहवालामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. डॉक्टर फहीम म्हणाले, की हे आपल्याला माहिती आहे की कोरोना हवेतून पसरतो. मात्र, हवेतून कोरोना पसरण्याचा अर्थ असा अजिबातही नाही की हवाच कोरोना संक्रमित आहे. याचा असा अर्थ आहे, की हवेतही कोरोना विषाणू बराच वेळ राहू शकतो. फहीम म्हणाले, की हे खरं आहे की विषाणू हवेमध्ये टिकून राहात आहे. यामुळे घरांमध्ये आणि इमारतींमध्येदेखील धोका आहे. त्यामुळे, तुम्हाला स्वतःचा बचाव करण्यासाठी सतत मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. डॉक्टर फहीम यांनी असा सल्ला दिला, की कापडाचे मास्क वापरणं बंद करा. कापडाच्या मास्कऐवजी आता तुम्ही N95 किंवा KN95 मास्क वापरणं गरजेचं आहे. एका मास्कचा वापर तुम्ही 24 तास करा. वापर केल्यानंतर हे मास्क एका पेपर बॅगमध्ये ठेवा. यानंतर तुम्ही दुसऱ्या मास्कचाही पूर्ण दिवस वापर करा आणि हे मास्कदेखील वापरानंतर पेपर बॅगमध्ये ठेवा. यानंतर पहिल्यांदा ठेवलेलं मास्क तुम्ही पुन्हा वापरु शकता. याप्रमाणे मास्क बदलत राहा. तुमचे मास्क चांगले असल्यास अशाच पद्धतीनं तुम्ही एक आठवडादेखील हे मास्क वापरु शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या