JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / धक्कादायक! Corona होऊनही RT-PCR test येतायत negative, घ्या ‘ही’ खबरदारी

धक्कादायक! Corona होऊनही RT-PCR test येतायत negative, घ्या ‘ही’ खबरदारी

रुग्णांना कोरोनाची (Corona infection) सर्व लक्षणं (Symptoms) असूनही आरटीपीसीआर (RT-PCR) टेस्ट निगेटिव्ह (Negative) येण्याचे प्रकार समोर आले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगळुरू, 14 जुलै: रुग्णांना कोरोनाची (Corona infection) सर्व लक्षणं (Symptoms) असूनही आरटीपीसीआर (RT-PCR) टेस्ट निगेटिव्ह (Negative) येण्याचे प्रकार समोर आले आहेत. कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीचे रिपोर्ट हे विश्वासार्ह मानले जातात. मात्र आतापर्यत कोरोनाची गंभीर लक्षणं असलेल्या 8 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा प्रकार बंगळुरूमध्ये (Bengaluru) घडला आहे. नेमकं काय घडलं? बंगळुरूमधील 8 जणांना कोरोनाची सर्व लक्षणं होती. त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. चाचणीचे रिपोर्ट येण्यापूर्वीच त्यांची लक्षणं बळावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यांच्या सिटी स्कॅनमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन झाल्याचं दिसून आलं. मात्र प्रत्यक्षात आरटीपीसीआर चाचणीचे रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आले. या आठपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मात्र एवढ्या गंभीर स्वरुपाचं इन्फेक्शन होऊनदेखील आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह कशी आली, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. हे वाचा - Sputnik V लसीसाठी महाराष्ट्रातील लोकांनीही गाठलं गुजरात; भलीमोठी वेटिंग लिस्ट हे असू शकतं कारण अनेकदा टेस्ट करण्यासाठी ती किट वापरली जातात, त्यांचा दर्जा खराब असेल, तर चाचणीच्या निष्कर्षावर त्याचा परिणाम होत असल्याचं सांथरोग तज्ज्ञ डॉ. रघु यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितलं आहे. ज्या नागरिकांना लक्षणे दिसत असूनही टेस्ट निगेटिव्ह येईल, त्यांनी सिटी स्कॅन करून घेणं, गरजेचं असल्याचं ते म्हणाले. आतापर्यंतच्या अनुभवानुसार एकूण चाचण्यांपैकी साधारण 10 ते 15 टक्के चाचण्यांचे अहवाल चुकत असल्याचं दिसून आलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणं एखाद्या व्यक्तीचे नमुने कधी गोळा केले जातात आणि ते कधी तपासले जातात, यावरही अशा चाचण्यांचे निष्कर्ष ठरत असल्याचं ते म्हणाले. जर लागण झाल्यावर नऊ दिवसांची नमुने घेतले, तर ते निगेटिव्ह येण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणं जर नमुने घेतल्यानंतर बराच काळ ते तपासले गेले नाहीत, तरीही रिपोर्ट निगेटिव्ह येण्याची शक्यता असते, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या