JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / कोरोनाचा कहर! आधी आजोबा मग आई-वडील आणि आता मुलीचा कोरोनाने मृत्यू

कोरोनाचा कहर! आधी आजोबा मग आई-वडील आणि आता मुलीचा कोरोनाने मृत्यू

Four people of family die due to covid: कोरोनाचा कहरच म्हणावं लागेल, कोरोना बाधित होऊन संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब उद्धवस्त होत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उज्जैन, 23 एप्रिल: कोरोना विषाणूचा (Coronavirus) संपूर्ण देशभरात उद्रेक पहायला मिळत आहेत. अख्खं कुटुंबच्या कुटुंब बाधित होत आहे. अनेकजण कोरोनावर मात करत आहेत मात्र, काहींचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. आता असाच एक प्रकार उज्जैन **(Ujjain)**मधून समोर आला आहे. येथील अख्खंच्या अख्ख कुटुंब कोरोना बाधित झालं आणि त्यात त्यांचा मृत्यू (Entire family died due to covid) झाला. आधी आजोबा नंतर आई मग वडील आणि आता कुटुंबातील मुलीचाही कोरोनाने मृत्यू झाला आहे. संपूर्ण कुटुंब मृत झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उजैनमधील विक्रमनगरमध्ये राहणाऱ्या जैन कुटुंबातील सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. संतोषकुमार जैन, पत्नी मंजुळा आणि 26 वर्षीय मुलगी आयुषी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर काही दिवसांपूर्वी कुटुंबातील वयोवृद्ध असलेल्या आजोबांचे निधन झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, 3 एप्रिल रोजी संतोषकुमार जैन यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर 8 एप्रिल रोजी संतोष यांची पत्नी मंजुळा यांना ताप आला. तपासणी केली असता कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला. रुग्णालयात उपचार घेत असताना 10 एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. मग संतोष जैन यांच्या तब्येतीत बिघाड झाला. हृदयद्रावक! विरारच्या आगीत पतीचा मृत्यू; बातमी कळताच पत्नीचाही ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू संतोष आणि मुलगी आयुषी यांनी आपली कोविड टेस्ट करुन घेतली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच दरम्यान 16 एप्रिल रोजी संतोष जैन यांचे निधन झाले तर 19 एप्रिल रोजी आयुषीचा मृत्यू झाला. कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत प्रशासनानेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. परदेशात राहते एक मुलगी संतोष कुमार जैन हे वीज कंपनीतून काही दिवसांपूर्वीच निवृत्त झाले होते. त्यांची पत्नी मंजुळा सरकारी शाळेत शिक्षिका होत्या. जैन दाम्पत्याला दोन मुली आहेत. त्यापैकी एक मुलगी लग्नानंतर नेदरलँड्समध्ये राहते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या