जगभरातून शंका घेतल्या गेल्यानंतर आता 45 केंद्रांवर 40 हजार लोकांना ही लस देण्यात येणार असल्याचं रशियाने म्हटलं आहे.
नवी दिल्ली 5 जुलै: कोरोना व्हायरसवर जगभरात लस (covid-19 vaccine) शोधण्याचं काम सुरू आहे. त्यात भारतही आघाडीवर असून दोन कंपन्यांनी मानवी चाचण्यांसाठी परवानगीही मागितली आहे. त्यानंतर देशात नव्या वादाला सुरूवात झाली होती. 15 ऑगस्टपर्यंत देशात कोरोनावर लस येऊ शकते असं ICMRने म्हटलं होतं. त्यावर शंका उपस्थित करण्यात येत होती. आता या वादावर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने (Science & Technology Ministry) भाष्य केलं असून 2021पर्यंत ही लस बाजारात येणार नाही असं म्हटलं आहे. जगभरात 140 कंपन्यांची औषधं मानवी चाचणीच्या प्रक्रियेपर्यंत पोहोचली आहेत. त्यात 11 औषधं ही भारताची आहेत. त्यात कोवेक्सिन आणि ZyCov-D या दोन औषधांचा माणसांवर प्रयोगाची घोषणाही झाली आहे. ICMRच्या घोषणेनंतर तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली होती. अशा कामांमध्ये घाई करू नये असाही सल्ला दिला गेला होता. त्यानंतर विज्ञान मंत्रालायाने स्पष्टिकरण देत ICMRचा दावा खोडून काढला आहे. औषध वापरासाठी येण्यापूर्वी अनेक परिक्षणांमधून त्याला जावं लागतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या प्रक्रियेत काही सवलत जरी दिली गेली तरी मुलभूत नियमांना डावललं जाऊ शकत नाही. राज्यात आजही उच्चांकी 6555 कोरोना रुग्णांची वाढ, मृत्यूचा आकडा गेला 8822 वर औषधाचा परिणाम हा थेट माणसाच्या शरिरावर होत असल्याने त्याचे सगळे परिणाम तपासले जात असतात. त्यामुळे यात कुठलीही घाई करू नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. हिरेव्यापाऱ्याने वाढदिवसाला दिली जंगी पार्टी, दोनच दिवसांत झाला कोरोनाने मृत्यू या संशोधनात अमेरिका आघाडीवर आहे. तर काही औषधं जगभरातले शास्त्रज्ञ एकत्र येत संशोधन करत आहेत. औषध तयार झालं तर जगभरात ते कश्या प्रकारे पोहोचवायचं याची योजनाही काही कंपन्यांनी तयार केली आहे. तर अमेरिकेने त्यासाठी लष्कराची मदत घेण्याची घोषणा केली आहे. संपादन - अजय कौटिकवार