नाशिक, 18 मे : सध्या कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लक्षणं दिसताच त्या व्यक्तीचे घसा आणि नाकातील स्वॅब नमुने घेतले जातात आणि त्यांची चाचणी करून त्या व्यक्तीला कोरोनाव्हायरस आहे की नाही याचं निदान केलं जातं. मात्र या चाचणीला (corone test) वेळही जास्त लागतो, शिवाय ती खर्चिकही आहे. मात्र आता फक्त एक्स-रे मार्फत कोरोना चाचणी करणं शक्य होणार आहे. ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाचेल. नाशिकमधील (nashik) ईएसडीएस (ESDS) या आयटी कंपनीनं एक सॉफ्टवेअर तयार केलं आहे. ज्यामुळे फक्त एक्स-रे (x-ray) मार्फत कोरोनाव्हायरसं निदान करणं शक्य आहे. प्रायोगिक चाचणीत ही पद्धत यशस्वी ठरल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. कसं काम करणार सॉफ्टवेअर? कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीची टेस्ट करायची आहे, त्याच्या छातीचा एक्स-रे काढावा लागेल. या एक्स-रेची डिजीटल प्रिंट या सॉफ्टवेअरमध्ये लोड करावी लागेल. सबमिट टॅबवर क्लिक केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच त्या व्यक्तीचा रिपोर्ट येईल. या सॉफ्टवेअरच्या वापराला आवश्यक ती परवानगी मिळवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. रोबो करणार रुग्णांची प्राथमिक तपासणी तर दुसरीकडे पुण्यात कोरोनाची प्राथमिक तपासणी करण्यासाठी एक विशिष्ट चालता बोलता रोबोच पुणे कॅन्टॉनमेंटच्या आयटीआयने विकसित केला आहे. यामुळे कोरोनाचे प्राथमिक निदान होण्यास मदत होणार आहे. हा चालता बोलता रोबोट नागरिकांचे स्क्रींनिग अगर तपासणीच करून थांबणार आहे, असे नाही. तर तो नागरिकांना आरोग्याबाबतचे विविध प्रश्न देखील विचारणार आहे. त्यासाठी खास वेगळी यंत्रणा या रोबोमध्ये विकसित करण्यात आली आहे. हे वाचा - चिंता वाढली! कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची होऊ शकते अशी अवस्था रोबोने विचारलेल्या प्रश्नांवर नागरिकांनी उत्तरे दिल्यानंतर संबधित रूग्णांस कोरोना वॉर्डमध्ये दाखल करावयाचे की, विलगीकरण कक्षात ठेवायचे याचा निर्णय रूग्णालयातील डॉक्टर घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात हा रोबोट रूग्णालयातील कॅज्युअल्टीमध्ये बसविण्यात येणार आहे. रोबोट चालता बोलता होण्यासाठी संगणकीकृत यंत्रणा बसविण्यात आली असून, नागरिकांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरची सोय करण्यात आली आहे. संपादन - प्रिया लाड हे वाचा - कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मोफत उपचार पद्धतीमध्ये त्रुटी, मनसे आमदाराचा आरोप