JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Pfizer Vaccine दिल्यानंतर लोकांमध्ये दिसली विचित्र लक्षणं, 90% प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा

Pfizer Vaccine दिल्यानंतर लोकांमध्ये दिसली विचित्र लक्षणं, 90% प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा

अमेरिकेच्या फार्मा कंपनीने तयार केलेली Pfizer लस कोरोनावर 90 टक्के प्रभावी ठरणार असल्याचा दावा केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

टेक्सस, 12 नोव्हेंबर : अनेकदा कोणत्याही प्रकारची लस घेतल्यानंतर सौम्य प्रकारचा ताप आणि दुखणं ही लक्षणं दिसतात. मात्र पहिल्यांदाच लस दिल्यानंतर रुग्णाला हँगओव्हर हे लक्षण दिसून आलं आहे. फायझर (Pfizer) कंपनीच्या लसीच्या चाचणीदरम्यान अनेक लोकांमध्ये हे लक्षण दिसून आलं आहे. त्याचबरोबर अनेकांना या लसीचा डोस दिल्यानंतर डोकेदुखी, ताप आणि अंगदुखीसारखी लक्षणं जाणवली आहेत. या संदर्भात एका 45 वर्षीय स्वयंसेविकेने दिलेल्या माहितीनुसार, या लसीच्या पहिल्या डोसमध्ये तिला साईड इफेक्ट दिसून आले. मात्र दुसऱ्या डोसमध्ये तिला काही गंभीर लक्षणं दिसून आली. तर टेक्ससमधील ग्लेन देशिल्ड्स या स्वयंसेवकाने या लसीच्या दुष्परिणामांची तुलना ‘गंभीर हँगओव्हर’शी केली आहे. त्याचबरोबर ही लक्षणं काही वेळातच गेल्याचे देखील त्याने सांगितले. वाचा- आता आला प्लाज्मा जेट स्प्रे, केवळ 30 सेकंदात असा मारणार Coronavirus! अमेरिकेच्या फार्मा कंपनीने तयार केलेली Pfizer लस कोरोनावर 90 टक्के प्रभावी ठरणार असल्याचा दावा केला आहे. क्लिनिकल ट्रायलमध्ये आतापर्यंत सहा देशांतील 43,500 स्वयंसेवकांनी तिसऱ्या टप्प्यातील लसीचा डोस घेतला आहे. त्याचबरोबर 8 नोव्हेंबरपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील लसीचा डोस 38,955 स्वयंसेवकांना देण्यात आला आहे. फायझर कंपनीने आपली पार्टनर बायोएनटेक कंपनीबरोबर ही लस विकसित केली आहे. mRNA-आधारित BNT 162b2 या लसीची चाचणी कंपनीने डबल ब्लाइंड मेथड वापरून केली आहे. यामध्ये सहभागी स्वयंसेवकांना माहीत नसतं की त्यांना लस दिली गेली आहे की प्लासिबो. ही कंपनीने तयार केलेली लस कोरोनावर 90 टक्के प्रभावी ठरणार असल्याचा दावादेखील कंपनीने केला आहे. मात्र या लसीमुळे दिसलेली लक्षणं काहीशी चिंता वाढवणारी आहे. वाचा- शास्त्रज्ञ दाम्पत्याची 90% प्रभावी कोरोना लस; लग्नाच्या दिवशीही करत होतं रिसर्च दुसरीकडे कोरोना लस तयार करण्याच्या या शर्यतीत Pfizer ही एकटीच कंपनी नाही. यावर्षी ऑक्टोबरमध्ये रशियाने sputnik-v लसीच्या चाचण्या आणि भारतातील वितरण मॉड्यूल्सवर काम करण्यासाठी हैदराबाद येथील डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळांसह भागीदारी केली आहे. त्याचबरोबर ब्रिटिश-स्वीडिश फार्मा कंपनी अ‍ॅस्ट्रॅझेन्काने ऑक्सफर्ड विद्यापीठासह लस मोठ्या प्रमाणात तयार करण्यासाठी पुण्यात असलेल्या भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाबरोबर करार केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या