JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / कोरोनाचं संकट त्यात कर्जबाजारीपणा; ICU मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाची आत्महत्या

कोरोनाचं संकट त्यात कर्जबाजारीपणा; ICU मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाची आत्महत्या

यापूर्वी अशा घटना घडल्या आहे. हे रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अंबेजोगाई, 28 जून : आंबेजोगाईच्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णाने पहिल्या मजल्यावरील शौचालयाच्या खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. प्रकाश उत्तम राठोड ( वय ३६ ) असं आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर स्वराती मध्ये उपचार सुरू होते. आंबेजोगाई तालुक्यातील साकूड येथील प्रकाश उत्तम राठोड याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शनिवारी ( २६ जून ) विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला स्वाराती रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्याच्यावर पहिल्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र मध्य रात्री 1 वाजताच्या सुमारास प्रकाशने बांधलेले हात कसेबसे मोकळे केले आणि हाताचे सलाईन काढून टाकून अतिदक्षता विभागाच्या बाहेर आला. ड्युटीवरील नर्स आणि डॉक्टर यांची नजर चुकवून त्यानंतर समोरच असलेल्या डायलिसीस विभागातील शौचालयात तो गेला. शौचालयाच्या खिडकीचे गज काढून त्याने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने खाली उडी मारली. हे ही वाचा- कोरोना लशीची कमाल! लस घेताच लकवा मारलेल्या शरीरात हालचाल; रुग्णाचा दावा या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. उपस्थितांनी त्याला तातडीने अपघात विभागात दाखल केले असता तिथे उपचारा दरम्यान पहाटे ३ वाजता प्रकाशचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रकाशच्या पत्नीच्या जबाबावरून अंबाजोगाई शहर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हॉस्पिटलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच यापूर्वी अशा घटना घडल्या आहे. हे रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील शौचालयातील खिडकीतून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. प्रकाशाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या