JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / भारतात आणखी एका लशीचं उत्पादन होणार, 'या' कंपनीसोबत झाला करार

भारतात आणखी एका लशीचं उत्पादन होणार, 'या' कंपनीसोबत झाला करार

कोव्हॅक्सीन, झायडस सीव्ही, कोव्हिड शिल्ड, आणि आता बीई कंपनीचा या लशींच्या स्पर्धेत समावेश झाला आहे.

जाहिरात

तर या 35 लशींमध्ये 5 प्रयोगांवर जगभरातल्या तज्ज्ञांची आशा एकवटली आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. या कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी जगभरात 130 हून अधिक लशींवर सध्या काम सुरू आहे. या स्पर्धेत रशियानं 12 ऑगस्टला आपली लस आणून पहिला क्रमांक पटकावला मात्र या लशीवरून अनेक मतमतांतरं असल्याचं पाहायला मिळत आहे. तर ऑक्सफोर्डची लसही मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. भारतात आता भारत-बायोटेक कंपनीनंतर आणखी एक कंपनीकडून कोरोनाच्या लशीचं उत्पादन करण्यात येणार आहे. हैद्रबादमधील बायोलॉजिकल ई (BE) कंपनीनं यासंदर्भात नुकताच एक करार केला. येत्या काळात या चार कंपन्यांच्या लशीकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे. लोकमत नं दिलेल्या वृत्तानुसार बायोलॉजिकल ई (BE) आणि जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीचा या संदर्भात नुकताच एक करार झाला आहे. जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीनं तयार केलेल्या लशीच्या मानवी चाचणीतील दुसरा टप्पा सुरू आहे. हे वाचा- जगाला मिळाली आणखी एक Corona Vaccine, रशियानंतर ‘या’ देशानं दिली मान्यता जगभरात चार लशींची सध्या वेगानं चर्चा आहे. या लशींच्या मनवी चाचणीच्या अहवालाकडे आणि यशाकडे सर्वजण डोळे लावून बसले आहेत. कोव्हॅक्सीन, झायडस सीव्ही, कोव्हिड शिल्ड, आणि आता बीई कंपनीचा या लशींच्या स्पर्धेत समावेश झाला आहे. यापैकी कोणती लस यशस्वी होत आपला पहिला नंबर लावते याची आतूरतेनं सगळेच जण वाट पाहात आहेत. रशियानंतर चीनदेखील आपली कोरोना लस डिसेंबरपर्यंत बाजारात येईल अशी आशा व्यक्त केली.बीबीसीच्या रिपोर्टनुसार चीनच्या सिनोफार्म कंपनीने या वर्षाअखेरपर्यंत कोरोनाव्हायरसची लस तयार करणार असा दावा केला आहे. सिनोफार्मचे चेअरमन लिऊ जिंगझेन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल यूएईमध्ये होत आहे आणि डिसेंबरपर्यंत ही लस बाजारात येण्याची आशा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या