भोपाळ, 3 एप्रिल : मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील एका कुटुंबावर कोरोनाचा कहर झाला आहे. 18 दिवसात कुटुंबीयातील चार सदस्यांचा मृत्यू झाला. यामुळे घरातील सुनेने धसका घेतला आणि गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर कुटुंबात केवळ एक ज्येष्ठ व्यक्ती आणि लहान मुलं राहिली आहेत. रविवारी कुटुंबातील मोठ्या सूनेचं देखील निधन झालं. देवासमधील मैनाश्री नगर येथे राहणारे बालकिशन गर्ग यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ते अग्रवाल समाज देवासचे अध्यक्ष आहेत. सर्वात पहिल्यांदा त्यांची पत्नी चंद्रकला देवीचं कोरोनामुळे निधन झालं. 19 एप्रिल रोजी मोठा मुलगा संजय गर्ग, 20 एप्रिल रोजी छोटा मुलगा स्वप्नेळ गर्ग, पत्नी आणि दोन मुलांचं निधन झाल्यानंतर बालकिशन मानसिकदृष्ट्या कोसळले. एकामागोमाग एक झालेल्या मृत्यूनंतर कुटुंबात गोंधळ उडाला. हे ही वाचा- मरणही परवडेना! स्मशानात जाण्यासाठी उकळले बक्कळ पैसे; रुग्णवाहिका चालकाला अटक लहान सुनेने गळफास लावून केली आत्महत्या कुटुंबावर आलेल्या संकटामुळे लहान सून रेखा गर्ग हिचा बांध तुटला. 21 एप्रिल रोजी त्या धक्क्यात तिने गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर कुटुंबात ज्येष्ठ बालकिशन गर्ग आणि मोठी सून रितू, आणि सोबत चार लहान मुलं राहिले होते. यादरम्यान मोठी सून रितू गर्ग हिलाही कोरोनाची लागण झाली. तिला इंदूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रविवारी प्रकृती ढासळल्यानंतर तिनेही रुग्णालयात जीव सोडला. आता कुटुंबात बालकिशन गर्ग आणि चार मुलं राहिले आहेत. रविवारी मध्य प्रदेशात कोरोनाच्या 12662 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.