JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Corona Virus: तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा, रुग्णांच्या फुफ्फुसात होत आहेत गंभीर बदल

Corona Virus: तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा, रुग्णांच्या फुफ्फुसात होत आहेत गंभीर बदल

कोरोनाबाबत (Corona Virus) आता आणखी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. नव्या कोरोना रुग्णांबाबत तज्ज्ञांनी केलेला खुलासा चिंतेत भर घालणारा आहे.

जाहिरात

Corona नंतर या आजाराची वाढली भिती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 फेब्रुवारी : देशात कोरोना (Corona Virus) रुग्णांच्या संख्येत ( Corona Cases) पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. यात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढत आहे. कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यानं नागरिकांमध्ये काही प्रमाणात समाधानाचं वातावरण असतानाच रुग्णसंख्येतील वाढीनं पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. अशात आता आणखी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. नव्या कोरोना रुग्णांबाबत तज्ज्ञांनी केलेला खुलासा चिंतेत भर घालणारा आहे. लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, नव्यानं आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या छातीच्या एक्स रेमध्ये कमालीचा बदल झाला असल्याचं दिसून येत आहे . या रिपोर्टमध्ये रुग्णांच्या फुप्फुसांची अवस्था अतिशय वाईट झाल्याचं चित्र आहे. चिंताजनक बाब म्हणजे या रुग्णांची फुफ्फुसं पांढरी झाली असल्याचा दावा वैद्यतीय क्षेत्रामधील तज्ज्ञांनी केला आहे. याचबद्दल अधिक माहिती देताना छातीरोगतज्ज्ञ डॉ. राजरतन सदावर्ते म्हणाले, की याआधी रुग्णालयांमध्ये भरती होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या फुफ्फुसात हळूहळू बदल होताना दिसायचा. मात्र, आता रुग्णांची फुफ्फुसं लवकर खराब होत असून ही चिंताजनक बाब आहे. त्यांनी सांगितलं, की फुफ्फुसं खराब झाल्यावर किंवा जास्त त्रास झाल्यानंतर हे रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत. याच कारणामुळे त्यांच्यावर उपचार करणंही अवघड होत आहे. त्यांनी पुढे सांगितलं, की एक्स रे रिपोर्टमध्ये फुफ्फुसाची स्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळे, रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. यातील बहुतेक रुग्ण हे वृद्ध किंवा मग कोणत्या  ना कोणत्या आजारानं ग्रस्त असलेले असल्याचंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या