हैदराबाद, 09 जून : देशात सध्या कोविशिल्ड (Covishield), कोवॅक्सिन (Covaxin) आणि स्पुतनिक V (Sputnik v) लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी कोणती लस सर्वात प्रभावी याबाबत अद्यापही प्रश्न निर्माण केले जात आहेत. नुकतंच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनपैकी कोणती लस प्रभावी याबाबत संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं. त्यानंतर आता कोवॅक्सिन लस तयार करणाऱ्या भारत बायोटेक (Bharat biotech) कंपनीनेही मोठी अपडेट दिली आहे. हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनी कोवॅक्सिन लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा पूर्ण डेटा जारी करण्याच्या तयारीत आहे. जुलैमध्येच हा डेटा सार्वजनिक केला जाईल, अशी घोषणा कंपनीने केली आहे.
संपूर्ण डेटा जारी केल्यानंतर भारत बायोटेक फूल लायसेन्ससाठी अर्ज करणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. हे वाचा - लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्याची तयारी; चिमुकल्यांसाठी खास मेडिसीन किट भारत बायोटेकनं सांगितलं, तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा डेटा सर्वात आधी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेकडे (सीडीएससीओ) पाठवला जाईल. त्याआधी पीअर रिव्ह्यू जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध होईल. त्याच्या तीन महिन्यांत हा डेटा सीडीएससीओला पाठवला जाईल. त्यानंतर हा डेटा जुलैमध्ये सार्वजनिक केला जाईल. कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील अंतिम विश्लेषण उपलब्ध असेल तेव्हा कंपनी फूल लायन्सेन्ससाठी अर्ज करणार आहे, असं कंपनीनं सांगितलं. हे वाचा - 2 आठवड्यांपूर्वी लाँच झालेल्या कोरोना औषधाची कमाल; 12 तासांतच रुग्णाला डिस्चार्ज तीन जानेवारीला या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली होती. चाचणीत ही लस 78 टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान आता या लशीचं लहान मुलांवरही क्लिनिकल ट्रायल लवकरच सुरू होणार आहे. यासाठीदेखील मंजुरी मिळालेली आहे.