JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Amarnath Yatra: कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे अमरनाथ यात्रेबाबत मोठा निर्णय

Amarnath Yatra: कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे अमरनाथ यात्रेबाबत मोठा निर्णय

कोरोनाची (Corona) गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन श्री अमरनाथ देवस्थान बोर्डानं (Shri Amarnathji Shrine Board) या यात्रेची नोंदणी (registration) तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

श्रीनगर, 22 एप्रिल : सध्या संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या पेशंट्समुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढला आहे. हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना बेड मिळणं अवघड झालं आहे. तसंच गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झालाय. कोरोनाची ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन श्री अमरनाथ देवस्थान बोर्डानं  (Shri Amarnathji Shrine Board) या यात्रेची नोंदणी (registration) तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. देवस्थान मंडळाचं सध्याच्या परिस्थितीवर लक्ष आहे. परिस्थितीमध्ये सुधारणा होताच नोंदणी पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

यावर्षी 28 जून 2021 ते 22 ऑगस्ट 2021 या काळात अमरनाथ यात्रा होणार होती. दोन वर्षांनंतर प्रथम यात्रेचा पूर्ण कालावधी निश्चित करण्यात आला होता. यापूर्वी 2019 मध्ये 370 कलम रद्द झाल्यामुळे यात्रा निश्चित तारखेपर्यंत पूर्ण करण्यात आली नव्हती. तर 2020 मध्ये कोव्हिड 19 (Coronavirus) मुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. 2021 मध्ये तरी भाविकांना दर्शन घेता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र कोरोना व्हायरमुळे आता पुन्हा एकदा या यात्रेमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. Covid-19 भयंकर परिस्थितीची अखेर सुप्रीम कोर्टानेच घेतली दखल; मोदी सरकारकडे मागितला प्लॅन भारतानं टाकलं अमेरिकेला मागं देशभरात बुधवारी 24 तासात 3 लाख 15 हजार 478 नवीन रुग्ण (Corona Cases in India) आढळले आहेत. कोरोनाचा प्रसार झाल्यापासून आतापर्यंत एकाच दिवसात आढळलेली ही केवळ भारतातील नाही तर जगभरातील सर्वाधिक संख्या आहे. याआधी जगात एकाच दिवशी सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळण्याचा रेकॉर्ड अमेरिकेच्या नावावर होता. अमेरिकेत 8 जानेवारी 2021 रोजी 3,07,570 कोरोना रुग्ण आढळले होते. मात्र, आता याबाबतीत भारत सर्वात पुढे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या