JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / अरे देवा! Delta नंतर आता Eta variant, पहिला रुग्ण सापडला; किती भयंकर आहे कोरोनाचं हे नवं रूप?

अरे देवा! Delta नंतर आता Eta variant, पहिला रुग्ण सापडला; किती भयंकर आहे कोरोनाचं हे नवं रूप?

कोरोनाचा एटा व्हेरिएंट (Eta variant) बाबत तज्ज्ञ काय म्हणाले पाहा.

जाहिरात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगळुरू, 07 ऑगस्ट : एकिकडे देशात डेल्टा (Delta), डेल्टा प्लस (Delta plus) कोरोनाने चिंतेत टाकलेलं असताना आता कोरोनाचं आणखी एक नवं रूप (Corona variant) समोर आलं आहे. डेल्टानंतर आता एटा कोरोना व्हेरिएंट (Eta variant) आढळला आहे. कर्नाटकमध्ये (Karnataka) कोरोनाच्या या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण सापडला (Karnataka Eta variant) आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. कर्नाटकच्या मंगळुरूत एटा व्हेरिएंटचं पहिलं प्रकरण समोर आलं आहे. गुरूवारी मंगळुरूतील एका व्यक्तीला एटा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे.आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार चार महिन्यांपूर्वी ही व्यक्ती कतरला गेली होती. पण एटा संसर्गाचं हे पहिलं प्रकरण नाही आहे. याआधी एप्रिल 2020 मध्ये राज्यात एटा व्हेरिएंटचा रुग्ण सापडला होता, असं राज्याचे नोड अधिकारी आणि कोरोना होल जीनोम सीक्वेंसिंग समितीचे अध्यक्ष डॉ. व्ही. रवी यांनी सांगितलं. हे वाचा -  नाशिकमध्ये Delta Variant चे 30 रुग्ण, छगन भुजबळांनी दिली महत्त्वाची माहिती तज्ज्ञांच्या मते, मंगळुरूमध्ये आढळून आलेला एटा व्हेरिएंट संक्रमण आता चिंतेचे कारण नाही. हा व्हेरिएंट आजही इओटा, कप्पा आणि लॅम्ब्डासारखा व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट आहे. या व्हेरिएंटबाबत अद्याप शोध सुरू आहे. पण अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंट चिंतेचं कारण आहेत. या व्हेरिएंटमुळे संक्रमणाचा वेग वाढला आहे. हे वाचा -   मोठी बातमी! आता घ्यावा लागणार एकच डोस,Johnson & Johnson च्या Corona लशीला मंजुरी एटा व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेचाही धोका नाही, असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. कारण हा व्हेरिएंट जुना आहे, पण त्याची पुष्टी झालेली नाही. जर हा धोकादायक असता तर आतापर्यंत याचे बरेच केसेस दिसून आले असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या