JOIN US
मराठी बातम्या / करिअर / ...म्हणून भारतात वाढतंय बेरोजगारीचं प्रमाण? देशातील कंपन्यांमध्ये तयार होतंय चीनसारखं वर्क कल्चर; कसं ते वाचा

...म्हणून भारतात वाढतंय बेरोजगारीचं प्रमाण? देशातील कंपन्यांमध्ये तयार होतंय चीनसारखं वर्क कल्चर; कसं ते वाचा

कमी मनुष्यबळात जास्त काम असं सूत्र असलेल्या चीन आणि जपान या देशांच्या श्रेणीत आता भारतातील कंपन्यांचा समावेश होतोय

जाहिरात

IT क्षेत्रात नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 जानेवारी:  गेल्या काही वर्षांत भारतातील (India) वर्क कल्चर (Work Culture in India) बदलताना दिसत आहे. मर्यादित कर्मचाऱ्यांकडून जादा काम करून घेण्याची पद्धत आता भारतातील कंपन्यांमध्ये (Indian Companies jobs) रुजत आहे. चीन (work culture in China) आणि जपान (work culture in Japan) या देशांमधील कंपन्यांमध्ये कमी साप्ताहिक सुट्ट्या (Less Weekly Off) आणि दीर्घकाळ कामकाज (Long working Hour) असं वर्क कल्चर आहे. भारतात देखील हेच चित्र दिसत असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे. सरकारी आकडेवारीवरून ही स्थिती अधिक स्पष्टपणे अधोरेखित होते. देशभरात 100 पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असणाऱ्या कंपन्यांची संख्या खूपच नगण्य आहे. याविषयीची माहिती `आज तक`ने दिली आहे. कमी कर्मचाऱ्यांकडून जादा काम करून घेण्याची पद्धत देशभरात दिसून येत आहे. यामागे काही कारणं आहेत. सरकार स्टार्टअप (Startup ideas) आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) पाठबळ देत आहे. परंतु, तरीदेखील यातून अपेक्षित आऊटपुट मिळत नसल्याचं चित्र आहे. काही स्टार्टअप हे मर्यादित भांडवल असल्यानं मर्यादित कर्मचाऱ्यांकडून अधिक काम करून घेतात. तसेच काही कंपन्या अधिक नफा (Profit) मिळवण्यासाठी या पद्धतीचा वापर करतात. काही उद्योगपती जाणीवपूर्वक कंपनीचा विस्तार न करता दुसरी कंपनी सुरू करण्यास प्राधान्य देतात. यामुळे त्यांचा टॅक्स (Tax) तर वाचतोच आणि दीर्घकालीन हिशोबाच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत नाही. फार्मसी क्षेत्रात आहेत करिअरच्या अनेक संधी; जाणून घ्या कसं घ्यावं शिक्षण केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या (Union Ministry of Labor) ताज्या म्हणजेच 30 सप्टेंबर 2021 च्या आकडेवारीनुसार, देशातील केवळ 8 टक्के कंपन्यांमध्ये 100 पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असल्याचं दिसून येतं. उर्वरित 92 टक्के कंपन्यांमध्ये कर्मचारी संख्या 100 पेक्षा कमी आहे. 500 पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांविषयी बोलायचं झालं तर त्यांचा वाटा केवळ 1.4 टक्के आहे. अशा कंपन्यांमध्ये आयटी आणि बीपीओ क्षेत्राचा (IT & BPO Sector) वाटा सर्वाधिक आहे. आयटी आणि बीपीओ क्षेत्रातील 12.3 टक्के कंपन्यांमध्ये 500 पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच देशातील 4.1 टक्के कंपन्यांमध्ये 100 ते 199 कर्मचारी कार्यरत आहेत. 200 ते 499 कर्मचारी संख्या असलेल्या कंपन्यांचं प्रमाण 2.8 टक्के आहे. दुसरीकडे आश्चर्याची बाब म्हणजे 77 टक्के कंपन्यांमध्ये 40 पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत असल्याचं आकडेवारीवरून दिसतं. यापैकी बहुतांश कंपन्या या व्यापार (Trade) आणि वित्तीय सेवेशी (Financial Services) निगडीत आहेत. क्षेत्रनिहाय आकडेवारी पाहिल्यास, वित्तीय सेवांशी निगडीत 94 टक्के कंपन्यांमध्ये 40 पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत असल्याचं दिसतं. अॅकोमोडेशन ( Accommodation) आणि रेस्टॉरंट क्षेत्रातील 89 टक्के तर व्यापार क्षेत्रातील 80 टक्के कंपन्यांमधील कामकाज 40 पेक्षाही कमी कर्मचाऱ्यांवर चालतं. देशातील मोठ्या IT कंपन्यांमध्ये Job हवाय? मग ‘या’Programming Languages आताच शिका कमी मनुष्यबळात जास्त काम असं सूत्र असलेल्या चीन आणि जपान या देशांच्या श्रेणीत आता भारतातील कंपन्यांचा समावेश होतोय, या विश्लेषकांच्या म्हणण्याला ही आकडेवारी दुजोरा देताना दिसते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या