JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Wipro Recruitment: Wipro कंपनीमध्ये Begin Again प्रोग्रामअंतर्गत महिलांसाठी नोकरीची मोठी संधी; असं करा अप्लाय

Wipro Recruitment: Wipro कंपनीमध्ये Begin Again प्रोग्रामअंतर्गत महिलांसाठी नोकरीची मोठी संधी; असं करा अप्लाय

महिलांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.

जाहिरात

Wipro कंपनीत Freshers उमेदवारांसाठी भरती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगलोर, 07 नोव्हेंबर: बेंगळुरू-स्थित IT कंपनी, Wipro ने ‘Wipro’s Begin Again प्रोग्राम’ (Wipro’s Begin Again) लाँच करण्याची घोषणा केली आहे आणि ज्या महिला व्यावसायिकांना (Wipro’s Begin Again program for women) नोकरी दिली जाणार आहे. भारतात आधारित नोकऱ्यांसाठी ज्या महिलांना (Wipro Jobs for women) ​6 महिने ते 1 किंवा त्याहून अधिक वर्षांचा करिअर ब्रेक आहे त्यांच्याकडून अर्ज मागवले जाणार आहेत. विप्रोच्या बिगिन अगेन कार्यक्रमावर भाष्य करताना कंपनी म्हणाली, “बिगिन अगेन हा आमचा समावेश आणि विविधता (I&D) उपक्रम आहे ज्या महिला विश्रांतीनंतर त्यांचे करिअर पुन्हा सुरू करू पाहत आहेत - मग ते विश्रांती, मातृत्व, वृद्धांची काळजी, प्रवास, आवड, किंवा इतर कोणतीही वैयक्तिक कारणे असो अशा महिलांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. “हा उपक्रम प्रतिभावान महिलांना करिअरच्या संधी शोधण्यास सक्षम करतो ज्यामुळे त्यांच्या क्षमतेचा उपयोग होईल आणि उद्योगाच्या सध्याच्या मागण्यांनुसार त्यांना पुन्हा मार्गावर येण्याची परवानगी मिळेल.” असं विप्रो कंपनीकडून कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. Google Scholarship: Google ‘या’ विद्यार्थिनींना देणार 70,000 रुपये स्कॉलरशिप अशा पद्धतीनं करा अप्लाय सुरुवातीला या पदभरतीबाबत संपूर्ण माहिती घ्या. त्यानंतर तुम्ही पात्र असाल तर ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती भरा. संपूर्ण माहिती भरून झाल्यावर तुम्हाला SUBMIT वर क्लिक करायचं आहे. अशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकता. सुरक्षितता आणि आरोग्यावर भाष्य करताना कंपनी म्हणाली, “विप्रोमध्ये आमच्या कर्मचार्‍यांची सुरक्षा, आरोग्य आणि कल्याण याला खूप महत्त्व आहे आणि गेल्या काही आठवड्यांपासून आम्ही आमच्या कर्मचार्‍यांना कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावापासून वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या