JOIN US
मराठी बातम्या / करिअर / क्या बात है! 'या' कॉलेजमध्ये दिलं जातं श्रीमंतांच्या मुलांचं संगोपन करण्याचं शिक्षण; मिळतो कोट्यवधी पगार

क्या बात है! 'या' कॉलेजमध्ये दिलं जातं श्रीमंतांच्या मुलांचं संगोपन करण्याचं शिक्षण; मिळतो कोट्यवधी पगार

इंग्लंडमधल्या (England) नॉरलँड कॉलेजमध्ये (Norland College) हे शिक्षण देणारा व्यावसायिक अभ्यासक्रम (Professional Course) उपलब्ध आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लहान मुलांना सांभाळणं खूप सोपं आहे, असं तुम्हाला वाटतं का? ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत, त्यांना तरी हे नक्कीच सोपं वाटत नाही, वाटणार नाही; पण ही गोष्ट सोपी नसली तरी घरातल्या किंवा नात्यातल्या मोठ्या, बुजुर्ग व्यक्तींच्या टिप्स घेऊन जमायला लागते. तसंच, सवयीनेदेखील लहान मुलांना सांभाळणं जमू लागतं. त्यात आनंद असतो आणि आव्हानंही असतात. हे काम कितीही कठीण असलं, तरी बालसंगोपनाचं अधिकृत प्रशिक्षण एखादं कॉलेज देतं असं सांगितलं तर तुम्हाला पटेल का? नाही ना? पण हे खरं आहे. इंग्लंडमधल्या (England) नॉरलँड कॉलेजमध्ये (Norland College) हे शिक्षण देणारा व्यावसायिक अभ्यासक्रम (Professional Course) उपलब्ध आहे. त्या कॉलेजमध्ये Professional Nanny Training दिलं जातं. तुम्हाला वाटलं असेल, की नव्या काळातल्या नव्या तरुण पिढीला प्रशिक्षण देण्यासाठी या कोर्सची सुरुवात झाली असेल; पण तसं नाही. इ. स. 1800 सालापासून हे कॉलेज सुरू आहे. श्रीमंतांच्या घरातली मुलं कशी सांभाळायची, याचं प्रशिक्षण तिथे दिलं जातं. एमिली वॉर्ड यांनी या कॉलेजची स्थापना केली होती. तेव्हा इंग्लंडमध्ये अशा प्रकारचं लहान मुलं सांभाळण्याचं प्रशिक्षण कुठेही दिलं जात नव्हतं. त्यामुळे हे कॉलेज सुरू झाल्यानंतर थोड्याच कालावधीत ते लोकप्रिय झालं. या कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्यांना कॅम्पस प्लेसमेंटद्वारे (Campus Placement) नोकरीही मिळते. अनेक श्रीमंत कुटुंबांमधली मंडळी आपल्या मुलांना सांभाळण्याचं काम करू शकेल अशी (Caretaker) केअरटेकर/नॅनी शोधण्यासाठी या कॉलेजात येतात. हे वाचा - आता इंजिनिअरिंग नाही विद्यार्थ्यांना करायचंय ऑफ-बिट करिअर; या गोष्टी ठेवा लक्षात नॉरलँड कॉलेज हा इतका मोठा ब्रँड आहे, या कॉलेजमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या नॅनीजना (Nannies) एक ते सव्वा कोटी रुपयांपर्यंतचं पॅकेज सहज मिळतं. ब्रिटनमध्ये असं प्रशिक्षण न घेतलेल्या, परंतु नॅनी म्हणून काम करणाऱ्यांना मिळणाऱ्या पगारापेक्षा हे प्रमाण चौपट आहे. नॅनी बनण्याचा कोर्स चार वर्षांचा आहे. त्यात मुलींना शिवणकाम, स्वयंपाक आणि आपली कामं उत्तम पद्धतीने करण्यास शिकवलं जातं. मुलांचे नखरे, मस्ती यांना सामोरं कसं जायचं, मुलांना हाताळायचं कसं या गोष्टीही शिकवल्या जातात. स्वसंरक्षणाचं प्रशिक्षणही या मुलींना दिलं जातं. तसंच, ड्रायव्हिंग, सायबर सिक्युरिटी या गोष्टीही शिकवल्या जातात. लहान मुलांना सांभाळण्याबद्दलचं सर्व प्रकारचं प्रशिक्षण तर या कॉलेजातल्या मुलींना दिलं जातंच; मात्र कोणत्याही अवघड परिस्थितीचा सामना करावा लागला, तर काय करायचं, याबद्दलचं प्रशिक्षणही त्यांना दिलं जातं. या कोर्ससाठी एका वर्षाला तब्बल 15 लाख रुपये एवढा खर्च येतो. म्हणजेच चार वर्षांत 60 लाख रुपये. मात्र इथून बाहेर पडलेल्या बहुतांश जणींना ग्रॅज्युएशननंतर दुसऱ्या-तिसऱ्या वर्षापासूनच 30 लाख रुपये वगैरे मिळू लागतात. इथे प्रवेश घेण्यासाठी नेहमीच उपलब्ध जागांपेक्षा जास्त अर्ज येतात. इंटरव्ह्यू घेऊन उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाते. लहान मुलांच्या संगोपनाचा अनुभव असलेल्या, किंडरगार्टनमध्ये (Kindergarten) पूर्वी बेबीसीटिंग (Baby seating) केलेल्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जातो. ग्रॅज्युएशननंतर या उमेदवारांना निश्चित काम मिळतं. ब्रिटनशिवाय त्यांना चीन, अमेरिका आणि मध्य-पूर्वेतल्या देशांमधूनही नोकरीच्या ऑफर्स येतात. आहे की नाही कमाल!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या