तुमचीही मुलं डिप्रेशनमध्ये नाहीत ना?
मुंबई, 18 फेब्रुवारी: कोरोनामुळे संपूर्ण जगाला ऑनलाईन आणि डिजिटल टेक्नॉलॉजीचं (Digital Technology) महत्त्वं पटवून दिलं आहे. अगदी ऑफिसपासून तर शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणापर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन (Online Education) पद्धतीनं घेतल्या जात आहेत. महामारीमुळे शाळाही ऑनलाईन पद्धतीनं सुरु झाल्या आहेत. मात्र आता कोरोणचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यामुळे शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्यात आले आहेत. बोर्डाच्या परीक्षाही ऑफलाईन (MH Board Offline board exams) पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ऑनलाईन शिक्षणामुळे (Online Education Problems) विद्यार्थी शिक्षणापासून आणि शाळेतील शिस्तबद्ध वातावरणापासून दूर गेले आहेत. सतत ऑनलाईन शिक्षण आणि गॅजेट्सच्या जवळ असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा सुरु झाल्यानंतर काही समस्या (Problems students facing after corona) जाणवू लागल्या आहेत. तुमचीही मुलं हे प्रॉब्लेम झेलत (How to identify depression in students) नाहीत ना? आज आम्ही तुम्हाला कोरोनानंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बाबतीत जाणवू लागलेल्या प्रॉब्लेम्सबद्दल (Student facing problems in Online Education) सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेउया. अभ्यासात लक्ष नसणे (Lack of concentration in Study) कोरोनाआधी ऑफलाईन शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून शिक्षक अभ्यास करवून घेत असत. एखाद्या विद्यार्थ्याला काही समजलं नाही तर शिक्षण त्या विद्यार्थाला समजवून सांगत असत. तसंच शिक्षकांनाही विद्यार्थ्यांचा चेहरा आणि हावभाव बघून सर्व गोष्टी कळत होत्या. मात्र ऑनलाईन शिक्षणादरम्यान हे काहीच होत नाही. विद्यार्थ्यांना काय समजलं आहे काय नाही हे शिक्षकांना समजू शकत नाहीत. विद्यार्थ्यांचं लक्षही शिक्षणाकडे राहत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणात लक्ष नसल्याची समस्या येत आहे. अनेक विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षणादरम्यान लक्ष नसल्यामुळे आता ऑफलाईन शिकताना त्यांना समस्या येतात आहे. Exam Tips: विद्यार्थ्यांनो, बोर्डाच्या परीक्षांची भीती नको; हसत खेळत करा अभ्यास गॅजेट्सचा अति वापर (Over Use of Gadgets) कोरोना लॉकडाउनमुळे सर्वच गोष्टी ऑनलाईन झाल्या. त्यामुळे शिक्षणासाठी पालकांना आपल्या मुलांना नाईलाजास्तव स्मार्टफोन्स, टॅब्स असे गॅजेट्स घेऊन द्यावे लागले. मात्र या गोष्टींचा उपयोग फक्त शिक्षणासाठी नाही तर इंटरही गोष्टींसाठी होऊ लागला आहे. या गॅजेट्समुळे विद्यार्थ्यांना गेमिंग आणि सोशल मीडियासोबतच पॉर्न बघण्याचं व्यसनही लागण्याची शक्यता आहे. शाळा ऑफलाईन सुरु झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांना गॅजेट्स मिळत नाहीये म्हणून काही विद्यार्थी निराश आहेत. आत्मविश्वास नसणे (Lack of Self Confidence) काही विद्यार्थी अभ्यासात हुशार असतात तर काही विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये तर काही इतर गोष्टींमध्ये. मात्र कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या टॅलेंटला पुरेसा वाव मिळाला नाही असं लक्षात आलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं काम करता न आल्यामुळे ते निराश आहेत. शाळा पुन्हा सुरु होऊनही अजून स्पोर्ट्स किंवा इतर Activity सुरु झाल्या नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी झाला आहे. एकटेपणा (social Isolation) कोरोनाआधी ऑफलाईन शाळा सुरु असताना विद्यार्थी शिक्षकांसोबत बोलत असत. मित्रांबरोबर मधल्या सुटीत खेळत असत. ज्या गोष्टी विद्यार्थी पालकांना सांगू शकत नाहीत त्या मित्रांना सांगत असत. मात्र कोरोनामुळे हे सर्वच बंद झालं. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकटं वाटतं आहे. काही विद्यार्थी यामुळे डिप्रेशनमध्येही गेले असू शकतात. विद्यार्थी शाळा सुरू होऊनही आधीसारखे वागत नाहीत. मात्र विद्यार्थ्यांसाठी एकटेपणा धोकादायक आहे. विद्यार्थ्यांनो, शिक्षणासोबतच कमवा भरघोस पैसे; ‘हे’ पार्ट टाइम जॉब्स करून बघाच पालकांसाठी सल्ला जर अशा काही समस्या तुम्हा तुमच्याही पाल्यांमध्ये (Tips for Parents) जाणवत असतील तर त्वरित तुम्ही त्यांच्याशी बोलण्याची आणि त्यांना बदलत्या परिस्थितीबाबत समजवून सांगण्याची गरज आहे. मुलं लहान असल्यामुळे हा बदल ते लवकर स्वीकारणार नाहीत. मात्र पालकांची साथ असेल तर हे व्हायला वेळ लागणार नाही.