नागपूर, 15 सप्टेंबर: नॅशनल एन्व्हार्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (National Environmental Engineering Research Institute) नागपूर इथे भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NEERI Nagpur Recruitment) जारी करण्यात आली आहे. वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदासाठी भरती वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक (Scientific Administrative Assistant) पात्रता आणि अनुभव वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक (Scientific Administrative Assistant) - मराठी आणि हिंदी विषयांसह BA ची पदवी आवश्यक. तसंच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं ज्ञान असणं आवश्यक.
NEERI Nagpur Recruitment 2021
इतका मिळणार पगार वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक (Scientific Administrative Assistant) - 18,000 + HRA रुपये प्रतिमहिना हे वाचा - Railway Recruitment: रेल्वेमध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांच्या 3093 जागांसाठी भरती निवड प्रक्रिया या पदभरतीसाठी पात्र उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार आहे किंवा मुलाखत घेतली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 सप्टेंबर 2021
JOB TITLE | NEERI Nagpur Recruitment 2021 |
---|---|
या पदासाठी भरती | वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक (Scientific Administrative Assistant) |
पात्रता | मराठी आणि हिंदी विषयांसह BA ची पदवी आवश्यक. तसंच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं ज्ञान असणं आवश्यक. |
पगार | 18,000 रुपये प्रतिमहिना + HRA |
निवड प्रक्रिया | परीक्षा घेतली जाणार आहे किंवा मुलाखत घेतली जाणार आहे |
शेवटची तारीख | 20 सप्टेंबर 2021 |
हे वाचा - जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ इथे सुरक्षा रक्षक पदाच्या 25 जागांसाठी भरती; 10,000 रुपये मिळणार पगार सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.neeri.res.in/ या लिंकवर क्लिक करा