JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Big News: अकरावीची सीईटी न्यायालयाकडून रद्द, दहावीच्या मार्कांआधारे होणार प्रवेश

Big News: अकरावीची सीईटी न्यायालयाकडून रद्द, दहावीच्या मार्कांआधारे होणार प्रवेश

अकरावीच्या प्रवेशासाठी (11th class admission) घेण्यात येणारी सीईटी (Common entrance test) रद्द (Cancel) करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 ऑगस्ट : अकरावीच्या प्रवेशासाठी (11th class admission) घेण्यात येणारी सीईटी (Common entrance test) रद्द (Cancel) करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत. कोरोनाच्या काळात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी घेणे अनावश्यक आणि धोकादायक असून दहावीच्या गुणांच्या आधारावर अकरावीचे प्रवेश करण्यात यावेत, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. सीईटीचं झालं होतं नियोजन अकरावी प्रवेशाच्या सीईटीसाठी अर्ज करण्याची मुदत 2 ऑगस्टलाच संपली होती. ही सीईटी सक्तीची नसली, तरी या सीईटीच्या आधारावरच अकरावीचे प्रवेश देण्यात येणार होते. सीईटीमार्फत भरलेल्या जागा उरल्यानंतर दहावीच्या गुणांच्या आधारे उरलेले प्रवेश होणार होते. मात्र आता न्यायालयाने सीईटी घेण्यास नकार दिला असून ती रद्द करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. सीईटी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणीदेखील न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या परीक्षेसाठी एकूण 10 लाख 98 हजार 318 विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत. सरकारला धक्का न्यायालयाचा सीईटी रद्द करण्याचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पूर्ण निकाल अद्याप आपल्याकडे आला नसून नेमक्या कुठल्या कारणांमुळे सीईटी घेण्याला न्यायालयाने विरोध केला, याची माहिती घेऊ, अशी प्रतिक्रिया शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. हे वाचा - कोणी तुमचं Facebook Account लॉगइन तर केलं नाही ना?असं तपासून करा हे सुरक्षित बदल दहावीच्या गुणांआधारे प्रवेश दहावीच्या परीक्षा कोरोना काळामुळे होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे अकरावीत प्रवेश देण्यासाठी सीईटीचा पर्याय राज्य शासनाने निवडला होता. मात्र आता उच्च न्यायालयाने सीईटी रद्द करण्याचा आदेश दिल्यामुळे राज्य सरकारला दहावीच्या गुणांआधारेच अकरावीचे प्रवेश द्यावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी त्यांच्या जीवाशी खेळता येणार नसल्याचं उच्च न्यायालयानं म्हटल्यामुळे आता सीईटीचा अभ्यास कऱणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचाही हिरमोड होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या