SMS च्या माध्यमातून असा बघा निकाल
महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra Board 10th Result) आज अखेर जाहीर होणार आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी यांच्यातील धाकधूक चांगलीच वाढली आहे. मात्र हा दहावी निकाल नक्की कसा बघायचा आणि कधी बघायचा याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. तसंच गेल्या काही वर्षांत बोर्डाची वेबसाईट अनेकदा डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल (ssc result 2024) बघण्यात अडचणी आल्या होत्या. म्हणूनच आता बोर्डानं SMS च्या माध्यमातूनही निकाल बघण्याची सोय विद्यार्थ्यांसाठी केली आहे.
दहावीसाठी एकूण 72 विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. ९ विभागीय मंडळातून 15 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 84 हजार विद्यार्थ्या उत्तीर्ण झाले. 25 हजार 770 रिपीटर विद्यार्थी होते. त्यापैकी 12 हजार 900 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
SMS च्या माध्यमातून असा बघा निकाल
विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाइल फोनवरुन एक एसएमएस करायचा आहे.
त्या नंतर लगेचच त्यांना मोबाइलवर निकाल पहायला मिळेल.
यासाठी विद्यार्थ्यांनी MHSSC टाईप करुन स्पेस द्यायचा आहे.
यानंतर आपला Seat Number टाईप करायचा आहे.
यानंतर हा एसएमएस 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे.
तुम्ही हा एसएमएस पाठवताच अवघ्या काही क्षणात विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पहायला मिळेल.
निकाल आणि निकालानंतर कोणते कोर्सेस करावे, शिक्षणाचे काय ऑप्शन आहेत? तसंच चांगल्या पगाराचा जॉब कसा मिळवावा? या सर्व विषयांची माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.
किती वाजता जाहीर होणार निकाल
दरवर्षी प्रमाणे यंदाही दहावी बोर्डाचे निकाल सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येणार आहे.