मुंबई, 15 जुलै: आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी (Breaking News) समोर आली आहे. उद्या दहावीचा निकाल (Maharashtra SSC Results 2021) लागणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. कालपासून सोशल मीडियावर आज दहावी निकाल (SSC Result) लागणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर आज सकाळी शालेय शिक्षण मंत्रालयानं यावर स्पष्टिकरण देत तसंच दहावी निकाल याबाबत पूर्व कल्पना याची माहिती अधिकृत कळवण्यात येईल, असंही स्पष्ट केलं होतं. मात्र आता स्वतः वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होईल, असं ट्विट देखील गायकवाड यांनी केलं आहे. महत्त्वाची सूचना: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होईल.सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा! #SSC #results @CMOMaharashtra pic.twitter.com/q8dKHn1PDv
असा तपासा तुमचा निकाल अधिकृत महाराष्ट्र निकाल वेबसाइटला भेट द्या. maharashtraeducation.com मुख्यपृष्ठावरील महाराष्ट्र इयत्ता 10 च्या निकालाच्या 2021 च्या लिंकवर क्लिक करा. आपणास एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल. आपली क्रेडेन्शियल्स टाइप करा आणि लॉग इन करा. आपला एसएससी निकाल आपल्या स्क्रीनवर दिसून येईल. संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउट डाउनलोड करा. एकच नंबर! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘Most Popular’ असं होणार मूल्यांकन यावर्षी राज्य शिक्षण विभागाने निकालाच्या गणितासाठी पर्यायी मूल्यांकन निकष लावले आहेत. महाराष्ट्र वर्ग दहावीच्या मूल्यांकन निकषानुसार, वर्ग 9 ची वार्षिक परीक्षा आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यांकन, युनिट टेस्ट आणि प्री-बोर्ड मधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे निकाल मोजला जाईल.